बालकांना संस्कृतीची, हरिनामाची जाणीव करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:41 AM2021-02-20T05:41:12+5:302021-02-20T05:41:12+5:30
केसरी नंदन हनुमान मंदिर कोंढी (जवाहरनगर) येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह समारोपप्रसंगी ते बोलत होते. सप्ताहाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक ...
केसरी नंदन हनुमान मंदिर कोंढी (जवाहरनगर) येथे श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह समारोपप्रसंगी ते बोलत होते. सप्ताहाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक एस. बी. ताजने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुमेध श्यामकुवर, पोलीस उपनिरीक्षक कराडे, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती प्रेमदास वनवे, माजी पंचायत समिती सदस्य अमित वसाणी, प्राचार्य एस.एस.शेंदरे, समितीचे अध्यक्ष वातू वंजारी उपस्थित होते. सप्ताहमध्ये दैनिक कार्यक्रम सकाळी पूजा-पाठ, सायंकाळी हरिपाठ व विविध स्वरूपाची झाँकी दाखविण्यात आले. गोवर्धन पूजेचा कार्यक्रम कोंढी लगतच्या नदीमध्ये करण्यात आले. समारोपदिनी गोपाल काला व दहीहंडी कार्यक्रम करण्यात आले. महाप्रसादाने सप्ताहाचा समारोप करण्यात आला. प्रास्ताविक अरुण हटवार यांनी केले. संचालन व आभार प्रवीण साहूलकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी वैशाली चकोले, उमा यशवंत वंजारी, शंकर ठाकरे, राजू खेडेकर, अरुण हटवा, कृष्णा आंबीलडुके, बंडू खरवडे, प्रशांत चकोले, राहुल ठाकरे यांनी सहकार्य केले.