झालेल्या नुकसानीची भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:09 PM2018-02-22T21:09:43+5:302018-02-22T21:10:42+5:30
गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील पीक नेस्तानाबूत झाले. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानाचे पीक मातीमोल झाले. धान, गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांची प्रचंड हानी झाली.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : गारपीट आणि वादळी पावसामुळे शेतातील पीक नेस्तानाबूत झाले. भंडारा जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील धानाचे पीक मातीमोल झाले. धान, गहू, हरभरा, तूर आणि इतर रब्बी पिकांची प्रचंड हानी झाली. गारपिटीच्या नुकसानाचे सर्वेक्षण महसूल व कृषी विभागाने सुरू करून भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन विकासाच्या दृष्टीने विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्प मागील ३० वर्षापासून आजही पूर्ण झाले नाही. प्रकल्पग्रस्त लोकांच्या समस्याही सुटल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन उभारण्यात येईल. प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी किंवा २५ लाख द्यावे, ३० वर्ष होऊनही प्रकल्प पूर्ण झाला नाही.
मात्र या ३० वर्षात प्रकल्पग्रस्त लोकांचे कुटुंब वाढले या वाढीव कुटुंबाचे पुनर्वसन करावे, पर्यायी जमिनीसाठी प्रति एकर १० लाख रूपये देण्यात यावे.
गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात विलीन होत आहे. त्याचे मानवी शरीरावर विपरीत परिणाम आहे. त्यामुळे नागनदीचे सांडपाणी थांबविण्यात यावे. यासदंर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आदेश पारित करून पाणी दूषित करणाºया सर्व यंत्रणेला वैनगंगा नदीत येणाºया सांडपाणी शुद्ध करून सोडण्याचे आदेश निर्ममित केले. परंतु यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, असा आरोपही काँग्रेसने केला आहे. निवेदनात माजी खासदार नाना पटोले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे, सेवक वाघाये, आनंदराव वंजारी, जिया पटेल, प्रमोद तितीरमारे, प्रमिलाताई कुटे, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, मधुकर लिचडे, राजकपूर राऊत, दिपक गजभिये यासह अन्य पदाधिकाºयांच्या स्वाक्षºया आहेत.