ग्रामीण स्थळावर कोरोना लस उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:30+5:302021-03-04T05:07:30+5:30
भारतीय जनता पक्षाचे आरोग्य विभागाला निवेदन भंडारा : कोरोना संसर्गाचा लक्षात घेता शासनाने कोविड १९ अंतर्गत लसीकरणाची कार्य सुरू ...
भारतीय जनता पक्षाचे आरोग्य विभागाला निवेदन
भंडारा : कोरोना संसर्गाचा लक्षात घेता शासनाने कोविड १९ अंतर्गत लसीकरणाची कार्य सुरू केले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम जिल्हास्तरावर होत आहे, मात्र ग्रामीण भागातील मोठा वर्ग या सुविधेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी ग्रामीण स्तरापर्यंत सदर लस उपलब्ध देण्याबाबत व्यवस्था करण्याची मागणी, भारतीय जनता पार्टी तालुका भंडाराच्या (ग्रामीण) वतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना बुधवारी देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम जिल्हा पातळीवर राबविण्यात येत आहेत मात्र ग्रामीण भागातील मोठा वर्ग या लसीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिक रांगेत उभे राहणे शक्य नसल्यामुळे शासनाने ग्रामीण स्तरावर असलेल्या आरोग्य उपकेंद्राची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तेथील ज्येष्ठांनाही लसीकरणाचा लाभ मिळू शकेल. परिणामी कोविड १९ ही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप तालुका भंडारा ग्रामीण शाखेतर्फे करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देताना उल्हास फडके, मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, करमचंद वैरागडे, पवन मस्के, विकास मदनकर, संदीप मेश्राम, अनिल चौधरी, दीपक लांजेवार, प्रवीण साळवे, दत्ता जगदाळे आदी उपस्थित होते.