बेरोजगारी दूर करण्यासाठी नोकरी हक्क कायदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:00 AM2019-08-10T01:00:51+5:302019-08-10T01:01:22+5:30
देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.
९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता राणा भवन भंडारा येथे क्रांतीदिनाच्या पर्वावर आॅल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन एआयएसएफ व आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने बनेगा नावाचा कायदा करा व इतर रोजगार आणि शैक्षणिक समस्यांच्या समाधानासाठी ‘मागणी दिन’ पाळण्यात आला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवराज उके, पंकज गजभिये, क्रांती उके व भाऊराव गिºहेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी क्रांती उके यांनी युवक गीत सादर केला. मेळाव्यात युवक- विद्यार्थ्यांच्या मागण्यां विषयी बोलत असतांना क्रांतीदिनासंबंधीचा इतिहास, जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडांच्या उलगुलानची माहिती तसेच हिरोसीमा नागासाकीवर अमेरिकन साम्राज्यवाद्यानी केलेला बॉम्ब हल्ला आदीदी विषयीची माहिती हिवराज उके यांनी दिली.
त्यानंतर दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी दिनानिमित्त निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच १३ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. त्यात सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींना ३६५ दिवसाच्या रोजगाराची हमी देणारा भगतसिंग नॅशनल एम्प्लायमेंट गॅरंटी अॅक्ट या नावाने कायदा करुन सरकारने त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी. शिवाय रोजगार (नोकरी) मिळेपर्यंत वर्क वेटिंग अलाऊंसच्या रुपात सातव्या वेतन आयोगाच्या किमान समान वेतन इतकी आर्थिक मदत बेरोजगारास मिळावी अशा १३ मागण्यांचा समावेश आहे.
मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. केंद्र सरकार तसेच राज्य शासनाला पाठपुरावा करण्याचे सांगितले. शिष्टमंडळात हिवराज उके, एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे, सचिव भाऊराव गिऱ्हेपुंजे, रवि तिघरे, पंकज गजभिये, उपाध्यक्ष क्रांती उके, गंगाधर फाये, शाहिल मेश्राम, नेहा तिजारे, प्रेरणा गजभिये, अभिलासा मेश्राम, चेतना उके, मिताराम उके, गौतम भोयर आदीचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव गिऱ्हेपुंजे यांनी, तर आभार नेहा तिजारे यांनी मानले.