साकोली येथे निसर्गस्नेही गणेश मूर्ती बनवा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 09:44 PM2018-09-16T21:44:24+5:302018-09-16T21:44:50+5:30
येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनांतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे निसर्गस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनांतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे निसर्गस्नेही गणेशमूर्ती बनवा स्पर्धाचे आयोजन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्षा विद्या कटकवार व प्राचार्य विजय देवगिरकर यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक साधनाचा वापर करीत पर्यावरण संदेशयुक्त गणेशमूर्तीच्या कलाकृतीचे कौतूक केले. यावेळी ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने यांनी गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या पर्यावरणदुष्परिणामाची माहिती दिली. यात प्रामुख्याने वापरले जाणारे आॅईलपेंट, प्लास्टर आॅफ पॅरिस, निर्माल्य व ध्वनी प्रदूषण यावर माहिती दिले. यानंतर निसर्गस्नेही गणेशमूर्तीचे प्रदर्शन भरवून निरीक्षण करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय गटात डिंपल कापगते हिला प्रथम क्रमांक तर मिनल संग्रामेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तृतीय क्रमांक रोशन बागडेला प्राप्त झाला. विज्ञान विभागामधून धीरज सरकार याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
हायस्कुल गटात प्रथम क्रमांक मायावती उपरीकर हिला प्रथम क्रमांक तर रितीक शोरीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच आदित्य सोनकुसरे याला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. दिव्या राखडेला प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला. मिडलस्कुल गटात चेतना वाघमारे व पूर्वा बहेकार यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला. गुंजन नेवारे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर धारा गिडलानी हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. दिपाली लंजे व वैष्णवी लंजे यांना प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्त झाला.
स्पर्धेचे परीक्षण निसर्गप्रेमी शुभम बघेल, बाळकृष्ण मेश्राम, बी.एन. मांदाडे यांनी केले. आयोजनाकरिता निसर्गमित्र बाळकृष्ण मेश्राम, शुभम बघेल, आदित्य शहारे, युवराज बोबडे, शानिद पठाण, आर्यन टेंभुर्रे, रितीक शोरी, के.पी. बिसेन, संजय पारधी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.