राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 01:08 AM2019-01-11T01:08:24+5:302019-01-11T01:09:45+5:30
विद्यार्थ्यांना समाज आणि शाळेतून जे संस्कार मिळतात त्या आधारावर विद्यार्थी घडत असतो, विद्यार्थी हा मेणाचा गोळा आहे. त्याला आपण शिक्षकांनी योग्य संस्कार देणे आवश्यक आहे. राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी माधव फसाटे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : विद्यार्थ्यांना समाज आणि शाळेतून जे संस्कार मिळतात त्या आधारावर विद्यार्थी घडत असतो, विद्यार्थी हा मेणाचा गोळा आहे. त्याला आपण शिक्षकांनी योग्य संस्कार देणे आवश्यक आहे. राष्ट्र वैभवशाली करणारी पिढी घडावी, असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी माधव फसाटे यांनी केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी द्वारा संचालित समर्थ प्राथमिक, समर्थ बालक मंदिर आणि श्री समर्थ कॉन्व्हेंट, लाखनी येथील चार दिवसीय स्नेहसंमेलनाचे बुधवारपासून आयोजन करण्यात आले. स्रेहसंमेलनाच्या उद्घाटकीय कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर होते. यावेळी अतिथी म्हणून संध्या हेमणे, शीला रहांगडाले, मधुकर लाड, प्रा. आनंदराव खोलकुटे उपस्थित होते.
माधव फसाटे म्हणाले, जे आपण पेरू तेच उगवेल म्हणून उद्याचा आपला देश सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक घडवावा असे वाटत असेल, तर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करावे लागतील. स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांचे उपजत गुण या व्यासपीठावर प्रदर्शित करणे यासाठी स्नेहसंमेलन होणे आवश्यक आहे.
संध्या हेमणे यांनी विद्यार्थ्यांना गोष्टी रूपातून कथा सांगून विद्यार्थ्यांची मने जिंकली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शारीरिक कवायती व योगासने यांचे प्रात्यक्षिके करण्यात आले. शाळेचे अहवाल वाचन विद्यार्थी प्रमुख एकांत थानथराटे व दीप्ती निखाडे यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थितीत होती.
११ जानेवारीला डॉ. सोनाली भांडारकर, जितेंद्र फसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्नेहसंमेलन संयोजकांनी केले. यावेळी मुख्याध्यापक डू. शं. भांडारकर, मंगेश मरसकोले, वनिता माटे, ज. शि. निखाडे, बालक मंदिर प्रमुख उमा आगाशे, कॉन्व्हेंट प्रमुख प्राची धरमसारे उपस्थित होते.