अस्थायी रुग्णालयाऐवजी कायमस्वरूपी व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:53+5:302021-05-16T04:34:53+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेनासह विविध विषयांची आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात काेराेनासह विविध विषयांची आढावा बैठक शनिवारी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठाेड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. सचिन पानझाडे, बांधकाम विभागाचे मेश्राम उपस्थित हाेते.
जिल्ह्यात असलेले खेळाचे सभागृह किंवा शासनाच्या मालकीच्या सभागृहात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याची सूचना त्यांनी केली. व्यवस्थेचे विकेंद्रीकरण केल्यास तालुक्याच्या ठिकाणी रुग्णांवर उपचार करणे साेयीचे हाेईल. तालुक्यातच प्राणवायूची निर्मिती प्रकल्प उभारले गेल्यास रुग्णांसाठी व प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी याेग्य हाेणार असल्याचे सुनील मेंढे यांनी सांगितले.
पीएम केअर निधीतून जिल्ह्याला ५४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये प्राणवायूचा प्रकल्प तयार झाला आहे. त्याची माहिती यावेळी खासदारांनी घेतली. लसीकरणाचा आढावा घेताना एक लाख ३६ हजार लाेकांचे दुसरा डाेस घेणे बाकी आहे. ते लवकरच पूर्ण करावे, असे सांगितले. जिल्ह्याला ३०० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
भंडारा आणि पवनी तालुक्यात रेतीचे नियमबाह्य उत्खनन सुरू आहे. राॅयल्टी आणि इतर बाबींची तपासणी करावी, अशी सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांना करण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेरे विकत घेण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बीओटी तत्त्वावर तयार हाेणाऱ्या बांधकामासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या त्यानंतरही बांधकामाला परवानगी देण्यात आली. हा प्रकार चुकीचा असून यासंदर्भात वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेण्यात यावे, असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले.