सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:38 PM2018-06-30T22:38:50+5:302018-06-30T22:39:51+5:30

नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.

Make a school of excellence in social sense | सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

सामाजिक भावनेतून शाळेला संस्काराचे केंद्र बनवा

Next
ठळक मुद्देमुख्याध्यापकांची सभा : प्रकाश कोल्हे यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळांमधून मुल्य शिक्षणाची बीजे रोवली जावी. तसेच मुख्याध्यापकांनी शाळेला संस्काराचे केंद्र बनवावे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश कोल्हे यांनी केले.
लाल बहादूर शास्त्री विद्यालय येथे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या सभेत मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी कोल्हे बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप गणवीर, विज्ञान पर्यवेक्षक शत्रुघ्न कोडवती, शिक्षण विस्तार अधिकारी देवेंद्र शेंडे यांची उपस्थिती होती. शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. मुख्याध्यापकांनी वेळेवर काम सोयीस्कर करावे यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
दुसºया दिवशी साकोली, लाखनी, लाखांदूर व पवनी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची तर पहिल्या दिवशी मोहाडी, तुमसर व भंडारा येथील तालुक्यातील मुख्याध्यापकांची सभा पार पडली.
या सभेत मानव विकास योजना, शाळा सिद्धी, परिवहन समिती, सुरक्षा समिती, मुल्यशिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, शालेय स्वच्छता, ग्रंथालय उपयोग, प्रयोगशाळा, शाळेच्या कर्मचाऱ्यांचे रोष्टर, लेखा परिक्षण, वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती, वेतनपथक संबंधी समस्या, वृक्षारोपण आदी विषयावर चर्चा व माहिती देण्यात आली. अजुनही २६ शाळा, १० कनिष्ठ महाविद्यालयाचा वेतनेत्तर अनुदान शिक्षणाधिकारी यांच्या खात्यात पडून आहे. जुलै अखेरपर्यंत मुख्याध्यापकांनी असिसमेंट करावे. ७ तारखेपर्यंत वेतन बिल पाठवा १ तारखेला वेतन बँक खात्यात जमा करण्याची जबाबदारी आमची असेही शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी सांगितले.
शाळाच्या संच मान्यतेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तात्काळ दाखल करा, २ मे २०१२ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची माहिती विभागाला कळवा, मुख्याध्यापकांच्या जागा ज्या शाळेत रिक्त आहेत तिथे पदोन्नती घ्या, प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवा लवकरच वैद्यकीय मान्यता दिली जाईल.
८० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांनी शाळा सिद्धी माहिती भरा, प्रत्येक शाळेत तक्रारपेटी लावा, शाळांनी एनटीएस, एनएमएमएस, शिष्यवृत्ती परीक्षा यात मोठा सहभाग नोंदवावा, प्रोत्साहन भत्ताची प्रकरणे निकाली काढता येण्यासाठी प्रस्ताव काळजीने पाठवा अशा सुचना सभेत देण्यात आल्या.
वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ आहे. यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हा अशा सुचना शिक्षणाधिकारी कोल्हे यांनी दिली. मुख्याध्यापकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यासाठी दररोज व्यायाम व योगा करावे तेच शिस्तिचेही पालन करण्याचा सल्ला शिक्षणाधिकाºयांनी दिला. विविध योजनेची माहिती शत्रुघ्न कोडवती, प्रदीप गणवीर यांनी दिली.
वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी
जुलै महिन्यात मिळणाऱ्या कोणाच्याही वेतनवाढी रोखू नका. वेतन वाढीवर मुख्याध्यापकांनी स्वाक्षरी करावी. वार्षिक वेतनवाढ दिल्याशिवाय वेतन बिल पारित केले जाणार नाहीत.
६ ते ८ वर्गासाठी तीन शिक्षकांपैकी जेष्ठ शिक्षकांना माध्यमिक विभागावर दाखविता येईल. माध्यमिक स्तराची वेतन श्रेणी देता येईल. सेवाजेष्ठतासाठी सेवाशर्थी प्रमाणेच कार्यवाही करण्यात यावी.

Web Title: Make a school of excellence in social sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.