स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धक बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:30+5:302021-01-08T05:55:30+5:30

येथील जनता विद्यालयात आयोजित फ्लाईट स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉ. कृपाचार्य बोरकर होते. ...

Make students competitive in the age of competition | स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धक बनवा

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धक बनवा

Next

येथील जनता विद्यालयात आयोजित फ्लाईट स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉ. कृपाचार्य बोरकर होते. प्रमुख पहुणे म्हणून मुख्याध्यापक हेमंत केळवदे, संस्था कार्यवाह पंकज बोरकर, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शरद रेहपाडे, काळे, शिक्षण निरिक्षक नितीन वाघमारे उपस्थित होते. शिक्षणाधिकारी डोर्लीकर म्हणाले, गत आठ महिन्यापासून कोविड संक्रमण काळात ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे सुरू असून कोविड संक्रमण काळात जनता विद्यालयाने स्मरणिका तयार केली. या स्मरणिकेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेख कविता सादर केल्या. शाळा प्रशासनाने याकरिता विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी डोर्लीकर यांनी शाळा प्रशासनाचे कौतुक केले. कार्यक्रमाला आमदार राजू कारेमोरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. संचालन शिक्षिका भारती बोंद्रे, प्रास्ताविक शिक्षक पंकज बोरकर व आभार शिक्षिका राखी बिसेन यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

Web Title: Make students competitive in the age of competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.