अशा साध्यासोप्या पद्धतीने बनवा या गुणकारी रानभाज्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 04:14 PM2021-08-10T16:14:25+5:302021-08-10T16:15:18+5:30
Bhandara News भारतात भाज्यांच्या सुमारे ५५ हजार प्रजाती आहेत. ( vegetables ) पावसाळ्याच्या दिवसात जंगलात, डोंगरात, शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्या ग्रामीण भागात विशेषत्वाने मागवल्या व खाल्ल्या जातात.
संतोष जाधवर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भारतात भाज्यांच्या सुमारे ५५ हजार प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात जंगलात, डोंगरात, शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्या ग्रामीण भागात विशेषत्वाने मागवल्या व खाल्ल्या जातात. या रानभाज्या सोप्या व साध्या पद्धतीने बनवल्या जातात.
आता पाहू त्यातल्या काही महत्त्वाच्या भाज्यांची माहिती व पाककृती..
१) पाथरी -
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली, वरोरा, सिंदेवाही परिसरात या भाजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाथरीची भाजी बनवताना चिरलेली भाजी उकडून, शिजवून घ्यावी. डाळ, दाणे घालून फोडणी देताना दोन हिरव्या मिरच्या टाकून त्या एकत्र ढवळून एकजीव करावी. भाजीत थोडासा आंबटपणा येण्यासाठी ताक किंवा थोडासा गूळ घालून भाजी करता येते.
२) कुरडूची भाजी ...
कुरडूची पाने ही तुळशीच्या पानाएवढी असतात. ही भाजी शक्यतो आॅगस्ट, सप्टेंबरच्या कालावधीत चांगली वाढते. कुरडूची भाजी आजही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येते. कुरडूची पाने, बियाही उपयुक्त असतात.
३) आघाडा-
आघाड्याची कोवळी पाने बेलाच्या झाडाप्रमाणे शेंड्याकडे निमुळती असतात. आघाड्याची कोवळी पाने, बिया उपयुक्त आहेत. आघाड्याची पाने तोडून त्यामध्ये लसूण, कांदा, डाळीचे पीठ, फोडणीचे साहित्य घेऊन भाजी चिरून धुवून घ्यावी. लसणाच्या पाकळ्या तेलात टाकून भाजी करावी.
४) घोळ भाजी-
घोळ भाजी ही साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत आढळते. जिल्ह्यात दिवाळीनंतर
रब्बी हंगामात ही भाजी विक्रीसाठी येते. अनेकदा भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहजरित्या उगवते.
५) भुई आवळा-
भुई आवळ्याची पाने अतिशय नाजूक म्हणजेच शेवग्याच्या पानांपेक्षा लहान असतात. भुई आवळ्याची स्वच्छ केलेली दोन वाट्या भाजी, अर्धी वाटी तूर, मसूर किंवा मूग डाळ, दाण्याचे कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, लसूण टाकून कुकरमध्ये लसूण टाकून शिजवून नंतर फोडणी द्यावी.
या भाज्या झाल्या दुर्मिळ
१) केना-
केनाची भाजी आज दुर्मिळ होत आहे. शक्यतो पावसाळ्याच्या कालावधीतच ही भाजी मिळते. स्थानिक नाव केना. ही भाजी आज दुर्मिळ होत आहे. भाजी कापून तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, जीरा, केना भाजी कापून तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, जिरे, लाल तिखट, हळद, टोमॅटो, कोथिंबीर टाकून आवश्?यकतेनुसार पाणी टाकून ही भाजी बनवता येते. केनाचे थालीपीठही बनवले जाते. कालावधीतच ही भाजी मिळते. स्थानिक नाव केना आहे.
२) कपाळफोडीची भाजी
चंद्रपूर जिल्ह्यात कपाळफोडीच्या भाजीला स्थानिक नाव फोफांडा आहे. वेलवर्गीय ही भाजी असून, त्याच्या पानांची भाजी करतात. सेपिडीएसी या कुळातील ही भाजी आहे. कपालफोडीची पाने तोडून तेल, कांदा, मिरची, जिरे, तिखट, मीठ, हळद, मीठ, कोथिंबीर, टोमॅटो, टाकून ही भाजी बनवतात.
३) खापरफुटीची भाजी
स्थानिक नाव खापरफुटी या नावानेच ही भाजी ओळखली जाते. याची पाने तोडून तेल, कांदा, लसूण, मिरची, हळद, टोमॅटो, कोथिंबीर टाकून बनवतात. सर्वप्रथम भाजी धुवून तेल गरम करून कांदा फोडणी देऊन सर्व साहित्य टाकून शिजवून नंतर कोथिंबीर टाकावी.