स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार स्वत: बना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:02 AM2018-01-05T01:02:45+5:302018-01-05T01:03:02+5:30

शिक्षण ही विचारांची क्रांती असून विद्यार्थ्यांनी ती घडवून आणून स्वत:च्या जीवनाचा स्वत:च शिल्पकार बनायचं आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी अभियंत्याची भूमिका बजवायची, असे प्रतिपादन जि.प. सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांनी केले.

Make yourself the craftsman of his own life | स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार स्वत: बना

स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार स्वत: बना

Next
ठळक मुद्देनेपाल रंगारी यांचे आवाहन : एकोडी येथे वार्षिकोत्सव, अपूर्व विज्ञान मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शिक्षण ही विचारांची क्रांती असून विद्यार्थ्यांनी ती घडवून आणून स्वत:च्या जीवनाचा स्वत:च शिल्पकार बनायचं आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी अभियंत्याची भूमिका बजवायची, असे प्रतिपादन जि.प. सदस्य डॉ.नेपाल रंगारी यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय एकोडी येथे वार्षिकोत्सव व अपूर्व विज्ञान मेळाव्यात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून एकोडीच्या सरपंचा भुमीता तिडके, पंचायत समिती सदस्या उषा डोंगरवार, माजी सभापती शंकर राऊत, रमेश खेडीकर, कृष्णा तरोने, जनार्दन पुराम, गोविंदा लांजेवार, जानबा बावणकर, शिवराज हरिणखेडे उपस्थित होते.
द्विदिवसीय वार्षिकोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अंताक्षरी स्पर्धा वादविवाद स्पर्धा, भावगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा असा विविध बौद्धिक स्पर्धा, विविध एकल व सांघीक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी विलक्षण असा अपुर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केल्या गेले.
उपसरपंच राहुल समरीत व अतिथींच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. वार्षिकोत्सवासाठी प्राचार्य के.पी. बन्सोड, संयोजक चव्हाण, कुंभारे, साखरे, झंझाड, नंदेश्वर, मरस्कोल्हे, शिंदे, शेंडे, सिडाम, बेहरे, बोरकर, जांभुळकर, बिसेन, मेश्राम, वाट, कोरे, निंबेकर, गिºहेपुंजे, बोरकर, बन्सोड आदींनी सहकार्य केले. संचालन खेमराज वैद्य यांनी तर आभारप्रदर्शन वृंदा नंदेश्वर यांनी केले.

Web Title: Make yourself the craftsman of his own life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.