माळी समाज बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 10:54 PM2019-03-01T22:54:26+5:302019-03-01T22:54:59+5:30

भगतसिंग वॉर्डातील हटविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी माळी समाज बांधव व विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक दुकाने बंद दिसत होती.

The Mali society collapsed on the District Collectorate | माळी समाज बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

माळी समाज बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

googlenewsNext
ठळक मुद्देबंद संमिश्र : महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भगतसिंग वॉर्डातील हटविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी माळी समाज बांधव व विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा धडकला. या मोर्चात शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक दुकाने बंद दिसत होती.
नवीन टाकळी परिसरातील भगतसिंग वॉर्डात सार्वजनिक मोकळ्या जागेवर काही वर्षांपूर्वी महात्मा फुलेंच्या पुतळ्याची स्थापना केली होती. परंतु हा पुतळा तेथून उचलून नेण्यात आला. त्यावेळी शांतता भंग होवू नये म्हणून नागरिकांनी संयम पाळला. आता दोन महिन्यापुर्वी एका व्यक्तीने पुतळ्याच्या ओट्याची नासधूस करून अतिक्रमणास सुरूवात केली. त्याला माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी विरोध केला. परंतु नगरपरिषदेने कोणतीच कारवाई केली नाही. यानंतर अखिल भारतीय माळी महासंघाने ४ फेब्रुवारी रोजी व भारिप महासंघाने ५ फेब्रुवारी रोजी निवेदन देवून पुतळ्याची पुन:स्थापना करण्याची मागणी केली. त्यावरही कुणी कारवाई केली नाही.
त्यानंतर माळी महासंघ, समता परिषद, भारिप बहुजन महासंघ, ओबीसी क्रांतीमोर्चा व इतर संघटनांनी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. परंतु या मागणीकडे कुणीच लक्ष देत नसल्याने माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला. दरम्यान २२ फेब्रुवारी रोजी पालकमंत्र्यांच्या सभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली. अखेर शुक्रवारी भंडारा शहर बंदचे आवाहन केले. तसेच जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्याला येथील जलाराम मंगल कार्यालयापासून प्रारंभ झाला. गांधी चौक, मेनलाईन मार्गे येथील त्रिमुर्ती चौकात आला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चात खासदार मधुकर कुकडे सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व समता परिषदेचे अध्यक्ष संतोष भेदे, माळी महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत भुसारी, सुकराम देशकर, अरुण भेदे, भारिप बहुजन महासंघाचे महासचिव दीपक गजभिये, ओबीसी क्रांतीमोर्चाचे संयोजक संजय मते, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष गौतम कावळे, प्रकाश देशकर, प्रशांत सुर्यवंशी, भास्कर सुखदेवे, नितीन तुपाने, अजय तांबे, भारत वासनिक आदींनी केले. या मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. नवीन टाकळी येथील महात्मा ज्योतीबा फुले स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्याविरूद्ध कारवाई करावी यासह महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी यानिवेदनातून करण्यात आली.
बंद संमित्र
भंडारा शहरात विविध संघटनांच्यावतीने शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला अनेक व्यापाºयांनी प्रतिसाद दिला. परंतु कुणावरही जबरदस्ती करण्यात आली नाही. ३० ते ४० टक्के प्रतिष्ठाने बंद होती, असे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

Web Title: The Mali society collapsed on the District Collectorate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.