साकोलीत उपाध्यक्षपदी मल्लाणी

By admin | Published: January 17, 2017 12:15 AM2017-01-17T00:15:51+5:302017-01-17T00:15:51+5:30

नगरपरिषद उपाध्यक्षपदी तरुण मल्लाणी यांची तर स्वीकृत सदस्यपदी अ‍ॅड. दिलीप कातोरे व मोहन चांदेवार यांची अविरोध निवड करण्यात आली.

Mallika as the vice president of Sakoli | साकोलीत उपाध्यक्षपदी मल्लाणी

साकोलीत उपाध्यक्षपदी मल्लाणी

Next

न.प. निवडणूक : स्वीकृत सदस्यपदी कातोरे, चांदेवार यांची निवड
साकोली : नगरपरिषद उपाध्यक्षपदी तरुण मल्लाणी यांची तर स्वीकृत सदस्यपदी अ‍ॅड. दिलीप कातोरे व मोहन चांदेवार यांची अविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार पदनिर्देशीत अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले यांनी नगर परिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीची प्रक्रीया पार पडली. यात उपाध्यक्ष पदासाठी तरुण मल्लानी यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने तरुण मल्लानी यांना उपाध्यक्ष म्हणून अविरोध घोषित करण्यात आले. सदस्यसाठी अ‍ॅड. दिलीप कातोरे, मोहन चांदेवार, ललित खराबे, बंडु बोरकर, नईम अली व पंढरी कापगते यांचा अर्ज पदनिर्देशन अधिकारी यांनी अपात्र ठरविला. भाजपचे १४ सदस्य असल्यामुळे पदनिर्देशन अधिकाऱ्यांनी गटनेता अनीता पोगडे यांना पाच उमेदवारांची अधीकृत यादी दिली. यावर अनिता पोगडे यांनी अ‍ॅड. दिलीप कातोरे व मोहन चांदेवार या दोघांची शिफारस केली. या पत्राची दखल घेत तहसिलदार तथा मुख्याधिकारी खडतकर यांनी स्वीकृत सदस्य म्हणून अ‍ॅड.कातोरे व चांदेवार यांची घोषणा केली. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्याची घोषणा होताच बाहेर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत आंनदोत्सव साजरा केला. निवड करतेवेळी कार्याध्यक्ष खडतकर, प्रशासकीय अधिकारी परमार, नगराध्यक्ष धनवंता राऊत, नगरसेवक रविंद्र परशुरामकर, लता कापगते, शैलेश शहारे, रोहिनी मुंगुलमारे, भोजेंद्र गहाणे, राजश्री मुंगुलमारे, शैलु बोरकर, पुरुषोत्तम कोटांगले, अनीता पोगडे, नालंदा टेंभुर्णे, सुभाष बागडे, गिता बडोले, मिना लांजेवार, अ‍ॅड. मनिष कापगते, जगन उईके व वनिता डोये, शहर अध्यक्ष किशोर पोगडे, नितीन खेडीकर, आनंद सोनवाने, भगवान पटले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Mallika as the vice president of Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.