मालू टोला झाले लसवंत गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:50+5:302021-09-04T04:41:50+5:30
साकोली : साकोली तालुक्यातील मालू टोला या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन तालुक्यातून लसवंत ग्रामपंचायत होण्याचा ...
साकोली : साकोली तालुक्यातील मालू टोला या गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेऊन तालुक्यातून लसवंत ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकाविला आहे. गावातील १८ वर्षांवरील सर्व ६९२ पात्र लाभार्थ्यांनी लस घेतली असून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. यामुळे इतर गावापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मालू टोला ग्रामपंचायत मधील गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसादाबद्दल उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे , तहसीलदार रमेश कुंभरे, गटविकास अधिकारी नंदा गवळी सहायक ग. विकास अधिकारी, विस्तार अधिकारी के. डी. टेंबरे, डॉ. कुमरे, डॉ. नीलम खोटेले यांनी कौतुक केले आहे. मालू टोला येथील लोकसंख्या १०३० असून पात्र लाभार्थी ६९२ आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांनी कोरोना लसीकरण पहिला डोस घेतला आहे, व दुसरा डोस घेणारे २१५ आहेत. उर्वरित दुसरा डोस वेळापत्रकानुसार घेणार आहेत. लसीकरणासाठी सरपंच कृष्णा टेंभुर्णे ,उपसरपंच दिनेश कटरे ,निमगाव मरस्कोल्हे ,समीर बांबोडे, बायन टेंबरे, निरंजना परतेकी, गीता लांडे, रंजना मसराम ,ग्रामसेवक शिवा हातझाडे, रंजीत शरणागत , तलाठी ,मंडळ अधिकारी शरद हलमारे, मुख्याध्यापक वाघाडे, गिरिधारी नाकाडे ,राजेश कापगते, डोरले ,आशा सेविका पारधी, मंजूषा रहांगडाले या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तथा गावातील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, लोकनेते, युवक मंडळ, बचत गट, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वयोवृद्ध लोकांना पंचायत समितीतर्फे सहकार्य मिळाल्याने घरो-घरी जाऊन लसीकरण करण्यास मोलाचे सहकार्य मिळाले. मालूटोला, पुजारी टोला, गोपाल टोली ,येथील ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.