चिकना येथील मामा तलाव ओव्हर फ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:38 AM2021-09-18T04:38:12+5:302021-09-18T04:38:12+5:30
तालुक्यातील चिकना गावातील गट क्र. १५ मधील आराजी ७.१७ हेक्टर आर शासकीय जमिनीवर शासनाच्या जिल्हा परिषदच्या जलसंधारण व लघुपाटबंधारे ...
तालुक्यातील चिकना गावातील गट क्र. १५ मधील आराजी ७.१७ हेक्टर आर शासकीय जमिनीवर शासनाच्या जिल्हा परिषदच्या जलसंधारण व लघुपाटबंधारे विभागांतर्गत मामा तलाव निर्माण करण्यात आला. तथापि, गत अनेक वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या या तलावाचे गत काही वर्षांपूर्वीपासून खोलीकरण व दुरुस्ती काम केले नाही. गत फेब्रुवारी महिन्यात पीडित शेतकऱ्याने जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती काम करण्याची मागणी केली होती. मात्र या विभागाद्वारे पीडित शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, गत काही दिवसांपासून तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने मामा तलाव तुडुंब भरला आहे. मात्र साठवण क्षमता कमी असल्याने तलावातील पाणी ओव्हर फ्लो होऊन पीडित शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने धान पीक पाण्याने बुडाले आहे.
170921\1439-img-20210917-wa0015.jpg
मामा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने शेतात जमा असलेले पाणी