मामा तलावांचे तांत्रिक काम मजुर संस्थांना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 01:16 AM2016-05-25T01:16:07+5:302016-05-25T01:16:07+5:30

जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या अखत्यारितील २२२ मामा तलावांच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रकाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर करण्याची निविदा लपाने काढली आहे.

MAMA TALCO's Technical Work Labs! | मामा तलावांचे तांत्रिक काम मजुर संस्थांना!

मामा तलावांचे तांत्रिक काम मजुर संस्थांना!

Next

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर निविदा : जि. प. लघु सिंचाई विभागाचा कारभार
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाच्या अखत्यारितील २२२ मामा तलावांच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रकाचे काम पावसाळ्याच्या तोंडावर करण्याची निविदा लपाने काढली आहे. तांत्रिक कामे करण्याचा अधिकार नसणाऱ्या मजुर सहकारी संस्थांना ते देण्याचा घाट लघु सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घातल्याचा हा नवा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्ह्यातील जलस्त्रोतात वाढ व्हावी, यासाठी राज्यशासनाकडून जिल्ह्याला कोट्यवधी रूपये प्राप्त झाले. कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांनी पदभार स्विकारला तेव्हापासून त्यांनी निधी प्राप्त असतानाही अनेक कामे रेंगाळत ठेवले आहे. तर अनेक कामांना ‘वर्क आॅर्डर’ दिले नाही. त्यामुळे सुमारे ४० कोटींचा निधी अखर्चित आहे. यात जिल्ह्याला पहिल्यांदाच काही कामासाठी निधी प्राप्त झाला होता. तो ही निधी खर्च करण्यात आलेला नसल्याने शासनाकडे परत जाण्याच्या मार्गावर आहे.
जिल्ह्यात आजमितीस १ हजार २५४ मामा तलाव आहेत. या तलावांच्या देखभाल दुरूस्तीसाठी राज्य शासनाने निधी पुरविला आहे. त्याअनुशंगाने, सन २०१४-१५ मध्ये म्हणजेच दीड वर्षापूर्वी डीपीडीसी अंतर्गत जिल्ह्यातील मामा तलावांचे सर्वेक्षणसाठी तीस लाख रूपये लघु सिंचन विभागाला प्राप्त झाले. प्राप्त निधीतून मामा तलावांच्या सर्वेक्षणाचे काम केले नसल्याने तो निधी मागील दीड वर्षापासून तसाच पडून आहे. या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी आता लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शक्कल लढवून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यातील २२२ मामा तलावांच्या सर्वेक्षणाची निविदा सुचना प्रकाशित केलेली आहे. या कामांवर २९ लाख ९७ हजार १६० रूपये खर्च येणार असल्याची अंदाजित किंमत दर्शविण्यात आलेली आहे.

ई-निविदेत अर्धवट माहिती
लघु सिंचन विभागाने शासनाच्या संकेतस्थळावर ई-निविदा मागविली आहे. यात सदर विभागाने मे २०१६ असा महिना व वर्षाचा उल्लेख केला असला तरी तारीखेचा उल्लेख नाही. त्यामुळे जुन्या तारखेत ही जाहिरात दाखविण्याचा प्रकार असावा. यासोबतच तालुक्यांचे नावे व सर्व कामांची अंदाजित रक्कमचा उल्लेख केलेला आहे. वास्तविकतेत प्रत्येक कामांची सविस्तर माहिती प्रसिध्द करणे गरजेची आहे. त्यामुळे कोणत्या तलावांचे सर्वेक्षण केले याबाबत पारदर्शकता दिसून येणार नाही.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय
मजुर सहकारी संस्थांना तलावाचे खोलीकरण, बंधारा बांधकाम असे अंगमेहनतीचे कामे दिल्या जाते. मात्र पहिल्यांदाच मामा तलावांच्या सर्वेक्षण व अंदाजपत्रक बनविण्याचे काम देण्यात येणार असल्याची नोंद ई-निविदेत नमुद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मजुर संस्थेकडून करण्यात येणारे तांत्रिक काम दोषपूर्ण राहिल याबाबत शंका उत्पन्न होत आहे. यामुळे मात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय होणार आहे.
पावसाळ्यात सर्वेक्षणाचे काम संशयास्पद
अनेक मामा तलावांवर लगतच्या शेतकरी व अन्य नागरिकांनी अतिक्रम केले आहे. यामुळे तलावांचे क्षेत्रफळ कमी झालेले आहे. याबाबत सर्वेक्षण करून त्यावरील उपाययोजनांचे अंदाजपत्रक बनवायचे आहे. त्यामुळे आता तोंडावर पावसाळा असल्याने त्या दिवसात हे काम करणे शक्य नाही. त्यातल्या त्यात केवळ २२२ तलावांची यादी प्रकाशित करण्यात आलेली नसल्याने यात मोठी आर्थिक व्यवहार तर झाला नसले ना याबाब शंका उपस्थित होत आहे.
जानेवारीच्या कामांना वर्कआॅर्डर नाही
सदर विभागाने जानेवारी महिन्यात ई-निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्या कामांपैकी अनेक कामांना आता चार महिन्यांचा कालावधी लोटत असतानाही वर्कआॅर्डर देण्यात आलेले नाही. अपवाद केवळ ज्यांची टक्केवारी झाली. त्यांनाच कामांचे आॅर्डर देण्यात आले आहे. तर ज्यांनी मर्जी सांभाळली नाही. अशांना कामापासून दूर ठेवण्यात आल्याचेही कंत्राटदारांमध्ये बोलले जात आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांच्या कार्यकाळातील सर्व निविदांची चौकशी करावी, अशी मागणी काही बेरोजगार अभियंत्यांनी केली आहे.

४लघु सिंचन विभागाने ई-निविदा सुचना क्रमांक-९/२००६ दिनांक /५/२०१६ आॅनलाईन संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. यात अनेक त्रृट्या दिसून येतात. याबाबत लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. पराते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, त्यांनी याबाबत ‘नो कॉमेन्ट्स’ म्हणून प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

Web Title: MAMA TALCO's Technical Work Labs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.