माणूस कर्तृत्वाने माेठा हाेताे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:36 AM2021-02-16T04:36:07+5:302021-02-16T04:36:07+5:30
१५ लाेक १६ के मासळ : नावामध्ये काहीच दडलेे नाही, काेणताही माणूस हा नावाने माेठा नाही, तर ताे कर्तृत्वाने ...
१५ लाेक १६ के
मासळ : नावामध्ये काहीच दडलेे नाही, काेणताही माणूस हा नावाने माेठा नाही, तर ताे कर्तृत्वाने माेठा हाेताे असे विचार मासळ येथील ग्रामगीता भागवत सप्ताहात हभप माराेती बरडाेळे महाराज यांनी व्यक्त केले.
मासळ येथील गांधी चाैकातील हनुमान मंदिरात ग्रामगीता भागवत सप्ताहाचे आयाेजन केले आहे. समाजामध्ये जगत असताना काही लाेक नारदासारखे जीवन जगतात. माणसाने विचार करायला शिकले पाहिजे. सृष्टी चिरकाल टिकवण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे, असे विचार बरडाेळे महाराजांनी मार्गदर्शनात सांगितले.
बुधवार, दि. १० फेब्रुवारी राेजी हभप वरडाेळे महाराज व सरपंच सविता लेदे यांच्या हस्ते घटस्थापना करून भागवत सप्ताहाला सुरुवात झाली. दरराेज ध्यानपाठ, रामधून, प्रवचन, सामूहिक प्रार्थना, हरिपाठ आदी कार्यक्रमांतून लाेकांचा सहभाग वाढत आहे. हभप इंजाेरीकर महाराज, हभप गाेवर्धन नागपुरे महाराज यांच्यातर्फे दैनंदिन हरिपाठाचा कार्यक्रम हाेत आहे. दि. २६ फेब्रुवारी राेजी गाेपालकाला व महाप्रसादाने सप्ताहाची समाराेप हाेणार आहे. उपराेक्त कार्यक्रमासाठी परमेश्वर चिचमलकर, भय्यालाल लांजेवार, धनराज वांढरे, मुखळण लांजेवार, अमृत लांजेवार आदी परिश्रम घेत आहेत.