खात्यातील पैसे सांभाळा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:39 AM2021-09-22T04:39:28+5:302021-09-22T04:39:28+5:30

बॉक्स २०२०२ मधील सायबर क्राईम कोरोना काळात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचा रोजगार ...

Manage money in the account The incidence of online fraud has increased | खात्यातील पैसे सांभाळा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या

खात्यातील पैसे सांभाळा ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या

Next

बॉक्स

२०२०२ मधील सायबर क्राईम

कोरोना काळात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. कोरोना महामारीच्या काळात अनेकांचा रोजगार बुडाला. यात काही संधीसाधू लोकांनी याचा चांगलाच गैरफायदा उचलला. विविध शक्कल लढवून बँकेच्या खात्यातील रक्कम कशी वळती करण्यात येईल, याचाही अभ्यास या चोरट्यांनी केला. गत पाच वर्षांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास कोरोना काळात यात वाढ झाल्याचे दिसून येते.

कोट बॉक्स

नागरिकांनी सजग रहावे

कुठलाही ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सतर्कता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. आजकाल शिक्षित लोक अशा व्यवहाराला बळी पडल्याचे दिसून येत आहेत. कुठलाही संदेश किंवा मेसेज आल्यास त्याची खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नका, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

Web Title: Manage money in the account The incidence of online fraud has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.