कोरोनामुळे निर्माण झालेल्या ताणतणावाचे व्यवस्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:33 AM2021-05-01T04:33:41+5:302021-05-01T04:33:41+5:30
बॉक्स ताणतणावाचे व्यवस्थापन करता यायला हवे यामधून मार्ग काढणे हे आपल्याच हातात सर्वस्वी आहे. त्यासाठी फक्त आपल्याला ताणतणावाचे व्यवस्थापन ...
बॉक्स
ताणतणावाचे व्यवस्थापन करता यायला हवे
यामधून मार्ग काढणे हे आपल्याच हातात सर्वस्वी आहे. त्यासाठी फक्त आपल्याला ताणतणावाचे व्यवस्थापन करता यायला हवे. सर्वप्रथम रुग्णाने पॉझिटिव्ह आहे हे कळल्यावर स्वत:ला आयसोलेट करून घ्यावे. इंजेक्शन न मिळाल्यास डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे सेवन करणे, नाश्ता करणे, जेवण व्यवस्थित करणे, समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञांशी फोनवर बोलणे, रोज व्यायाम करणे, चालणे, श्वसनाचे व्यायाम करणे, बागकाम करणे, निसर्गाशी हितगूज करणे, आपल्याला आवडणारे एखादे वाद्य वाजवणे, आत्मचरित्र वाचणे, सकारात्मक विचार असणाऱ्या मित्रांशी फोनवर बोलणे, प्रसारमाध्यमांचा वापर कमी करणे, घरच्यांशी सकारात्मक बोलावे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावाला अगदी हसत हसत सामोरे जाऊन कोरोनाला हरवू शकतो व पुन्हा नव्याने जीवन आनंदाने जगू शकतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वीरेंद्र बांते यांनी दिली.