मानव कल्याण सेवाश्रम पर्यटन स्थळ व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:33 AM2018-02-09T00:33:09+5:302018-02-09T00:33:21+5:30
मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करील, ....
ऑनलाईन लोकमत
तुमसर : मानव कल्याण सेवा आश्रम परसवाडाकडून सतत ४४ वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या जागर आश्रम कडून केल्या जात आहेत. अनेक सामाजिक ऋण फेडण्याची काम या संस्थेकडून होतय तेव्हा लवकरच आश्रमाला क दर्जाच्या पर्यंत पर्यटक स्थळ घोषित करण्याकरिता शासनाकडे पाठपुरावा करील, असे आमदार परिणय फुके यांनी जाहीर केले.
तुमचे तिथून पाच किलोमीटर अंतरावर परतवाडा येथे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांच्या वारसा घेत मानव न्याय सेवा आश्रमची स्थापना करण्यात आली. निरंतर ४४ वर्षापासून इथे वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांसह वार्षिक महोत्सवाचे ३ फेब्रुवारीला हनुमंत राव घूले (पाटील), उद्योगपती राजेंद्र चौधरी, किशोर कुंभारे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रतिमेचे अभिषेक आणि अखंड ज्योत प्रज्वलित करून सुरूवात केली आपल्या आध्यात्मिक प्रवचन करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. ४ फेब्रुवारीला सत्य साई संस्थान नागपूर यांच्याकडे आरोग्य शिबिराचे आयोजन रक्तदान शिबिर अनेक इतर रोगांची तपासणी शिबिर लावण्यात आले होते. हजारो भाविकांनी या शिबिराचा लाभ घेतला पाच तारखेला भाविकांच्या मनोरंजन करताना नाट्य करण्यात आली.
६ फेब्रुवारी २०११ सेवाआश्रम कडून नि:शुल्क २८ जोडपे विवाहबद्ध झाले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने विधानपरिषद सदस्य परिणय फुके आ. चरण वाधमारे, माजी आ. मधुकर कुकडे, विठ्ठलराव कहालकर, राजकुमार माटे, जिल्हा परिषदेचे सभापती धमेंद्र तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश गायधने यांनी आश्रमाच्या व्यवस्थांना बाबत भाविकांना सांगितले की हे आरम शासनाच्या नियामनुसार पंजीकृत केलेले आहे. या आश्रमाच्या लेखक झोपला चर्च शासनाकडून तपासून घेतला जातो. आरम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतो इतर कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगली जात नाही. मानवाचे कल्याण हेच आश्रमाचे ध्येय आहे, असे सांगितले. या आश्रमात करे सतत ४४ वर्षापासून नि:शुल्क सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केल्या जाते हे एक प्रशंसनीय कार्य या आश्रमात दरवर्षी केल्या जाते. आश्रमाला लवकरच क दर्जाचा पर्यटक स्थळ घोषित करण्यासाठी मी कटिबद्ध राहील, असा आ. परिणय फुके यांनी भाविकांना दिला. त्यानंतर आ. परिणय फुके यांनी संत कोटीचे भूमिपूजन केले. यासाठी लागणारा निधी विविध भाविकाकडून मिळणार आहे.