मंडई उत्सव म्हणजे ग्रामीण कलावंताचे व्यासपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 09:46 PM2018-12-05T21:46:13+5:302018-12-05T21:46:28+5:30
या विज्ञान युगात मंडई, मेला, दंडार, नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही लोककला जोपासली जात आहे. ग्रामीण कलावंतांना या मंडई उत्साहात झाडीपट्टी रंगभूमिका लेखक, कलावंत दिले आहेत. यातूनच झाडीपट्टी रंगभूमिची निर्मिती होवून अनेक रंगभूमी उदयास आल्या आहेत. गावात सादर होणाऱ्या नाट्य मंडळांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन द्या, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिचाळ : या विज्ञान युगात मंडई, मेला, दंडार, नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही लोककला जोपासली जात आहे. ग्रामीण कलावंतांना या मंडई उत्साहात झाडीपट्टी रंगभूमिका लेखक, कलावंत दिले आहेत. यातूनच झाडीपट्टी रंगभूमिची निर्मिती होवून अनेक रंगभूमी उदयास आल्या आहेत. गावात सादर होणाऱ्या नाट्य मंडळांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन द्या, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक यांनी केले.
लायन्स क्लब बाजार चौक चिचाळच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमी वडसा व चौरास पट्टी रंगभूमी मिश्रीत जय बजरंग नाट्य मंडळ निर्मित खैरी दिवाणच्या मौजा चिचाळ येथे 'बारबाद' या नाट्य प्रयोग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सभापती पंचायत समिती पवनी बंडू ढेंगरे, अध्यक्ष माजी सभापती युवराज वासनिक, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, पंचायत समिती सदस्या मंगला रामटेके, निलेश सावरबांधे, यशवंत लोहकर, उपसरपंचा मंजुषा गभणे, ग्रामपंचायत सदस्या मोना तिभागेवार, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, सरपंचा पाथरी जयश्री रोडगे, सरपंच आकोट मनिषा गजभिये, अशोक सम्राट सेना संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश काटेखाये, मुनिर शेख, तुलशीराम गेडाम, जयराम दिघोरे, विक्की पचारे, आशिष मेश्राम, दिनेश नंदपुरे, अनिल तेलमासे, जयश्री कुंभलकर, अल्का काटेखाये, नलू बिलवणे, वर्षा काटेखाये, जगतराम गभणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पाहुण्याचे हस्ते सत्र २०१८ तील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ व १० वीतील संकेत निवृत्ती तलमले, अनुश्री रविंद्र तलमले, प्रणय राजु काटेखाये यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. लायन्स क्लब चिचाळच्या वतीने गावात शैक्षणिक सांस्कृतिक, शारीरिक, अनेक क्षेत्रातील उपक्रम राबविले जातात, अशा कल्बला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे उपसरपंचा मंजुषा गभणे म्हणाल्या तर तोमेश्वर पंचभाई, निलेश काटेखाये, मंगला रामटेके आदींची भाषणे झाली.
संचालन राजेश नंदपुरे, आभार अनुप हातेल कार्यक्रम यशस्वितेसाठी रवि आसंगारी, संदीप मोरे, निखिल वाहने, अखिल शहारे, मंगेश गजभिये, निकेश हातेल, सुधाकर हातेल, सोनु हातेल, रमेश लेंडे, टेकराम मांडवकर, किशोर वैरागडे, सोनु उके, धनराज काटेखाये, दिनेश हातेल, आशिष पडोळे आदींनी सहकार्य केले.