जिल्ह्यात तब्बल २७७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:00 AM2020-09-28T05:00:00+5:302020-09-28T05:00:30+5:30
रविवारी भंडारा तालुक्यात १५१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच साकोली तालुक्यात २४, लाखांदूर सात, तुमसर २२, मोहाडी व पवनी तालुक्यात प्रत्येकी २६ तर लाखनी तालुक्यात २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २५९० व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले. साकोली ३४४, लाखांदूर २११, तुमसर ४६७, मोहाडी ४७८, पवनी ४०५, लाखनी ४५९ रुग्णांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असून रविवारी तब्बल २७७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच भंडारा तालुक्यातील दोन जणांचा कोरोनाने आयसोलेशन वॉर्डात मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे आतापर्यंत १०३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
रविवारी २७७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक १५१ व्यक्ती भंडारा तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४९५० वर पोहचला असून आतापर्यंत २९५९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचाराखालील रुग्णांची संख्या १८८८ इतकी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात १८० व्यक्ती दाखल आहे. भंडारा तालुक्यातील ६५ वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरूषाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात कोरोनामुळे मृत्यू झाला.
रविवारी भंडारा तालुक्यात १५१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच साकोली तालुक्यात २४, लाखांदूर सात, तुमसर २२, मोहाडी व पवनी तालुक्यात प्रत्येकी २६ तर लाखनी तालुक्यात २१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यात आतापर्यंत २५९० व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले. साकोली ३४४, लाखांदूर २११, तुमसर ४६७, मोहाडी ४७८, पवनी ४०५, लाखनी ४५९ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्याचा मत्यूदर दोन टक्के
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्यू दर दोन टक्के एवढा आहे. आतापर्यंत आयसोलेशन वॉर्डातून २०८१ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत अॅन्टीजेन व आरटीपीसीआर कीटद्वारे ४१०३१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १२५५ जणांचे अहवाल अप्राप्त आहेत. दरम्यान रविवारी ७१ जणांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत एक लक्ष १९ हजार ४८७ नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केले आहे. या अॅपच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोनाबाबत जनजागृतीही केली जात आहे.
पवनीतील कोवीड तपासणी केंद्रावर गैरसोय
पवनी : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम अंतर्गत पवनी येथील ग्रामीण रुग्णालय परिसरात कोवीड-१९ तपासणी केंद्रसुरु करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वयंप्रेरणेने टेस्ट सेंटरवर येवून तपासणी करीता उपस्थित राहणे सुरु केले आहे. तपासणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. पालिका प्रशासनाच्या मालकीचे राजीव गांधी सभागृह असतांना कोवीड-१९ टेस्ट सेंटर ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरु करण्यात आले आहे. गर्भवती महिला व लहान बाळांना तसेच वयोवृद्ध नागरिकांना तपासणी करीता आल्यावर बसण्याची व्यवस्था नाही. नागरिक त्यांचे सोयीनुसारजमीनीवर बसून प्रतिक्षा करीत असताना आढळून आले. तपासणी करीता आलेल्या नागरिकांनी टेस्ट सेंटरवरील गैरसोय पाहून लोकमत प्रतिनिधीकडे प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.