गोंदिया व भंडारा जिल्ह्यात अनेक ईव्हीएम मशीन्स सकाळीच बिघडल्या; टक्केवारी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 09:58 AM2018-05-28T09:58:23+5:302018-05-28T09:58:37+5:30

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला २८ मे रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरूवात झाली. मात्र बऱ्याच मतकेंद्रांवरील ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान मंदावल्याची वार्ता आहे.

Many EVM machines in Gondia and Bhandara districts deteriorate in the morning; Percentage dropped | गोंदिया व भंडारा जिल्ह्यात अनेक ईव्हीएम मशीन्स सकाळीच बिघडल्या; टक्केवारी घसरली

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात अनेक ईव्हीएम मशीन्स सकाळीच बिघडल्या; टक्केवारी घसरली

Next
ठळक मुद्देदीड-दोन तासांपासून मतदान ठप्पमतदार उन्हातान्हात ताटकळत बसले

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया/ भंडारा:
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला २८ मे रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरूवात झाली. मात्र बऱ्याच मतकेंद्रांवरील ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान मंदावल्याची वार्ता आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा येथील बूथ क्र. २४९ मधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने फक्त दोनच जणांना आतापर्यंत मतदान करता आले आहे.
उन्हाळ््याच्या दिवसात सकाळीच जाऊन मतदान करावे या विचाराने मतदार बाहेर पडले मात्र मशीन्समध्ये निर्माण झालेल्या बिघाडामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
साकोली तालुक्यातील कुंभलीसर तीन ठिकाणी, तुमसर तालुक्यात ११ ठिकाणी, पवनी तालुक्यात ६ ठिकाणी, मोहाडी तालुक्यात ४ ठिकाणी तांत्रिक बिघाड आला आहे.
तुमसर तालुक्यातील खरबी मतदान केंद्रावरील २३३ आणि २३४ बूथ वरील ईव्हीएम दीड तासापासून बंद पडलेले आहेत मतदार मतदानाकरिता दूरवरून आलेले नागरिक दीड तासापासून तिथे बसलेले आहेत. या केंद्रात कोणतीही मशीन जास्तीची नसल्यामुळे सध्या तिथे मतदान बंद पडलेला आहे. मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. परंतु अद्याप ही मशीन्स दुरुस्त झालेली नाहीत.
तिरोडा तालुक्यातील चांदोरी खूद मतदान केंद्रावरील मशीन्समध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे १ तासापासून मतदान ठप्प पडले आहे.
याचसोबत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, किनाळा, चिंचोली अंतरगांव, मोहरना, खैरना या गावातील मशीन्स बंद पडल्याच्या बातम्या आल्या आहेत.

Web Title: Many EVM machines in Gondia and Bhandara districts deteriorate in the morning; Percentage dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.