प्रोटीनयुक्त आहार मिळण्यासाठी अनेकांचा खारीचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:33 PM2017-09-23T23:33:38+5:302017-09-23T23:33:53+5:30
कान्हळगाव / सिरसोलीच्या लेकींनी जिल्हास्तरावर विजयाची पताका रोवली. या यशाने गावात उत्साहाचे वातावरण आहे. ओसंडून वाहणाºया आनंदाच्या प्रवाहाला अनेकांनी मदतीचा हात समोर केला आहे.
राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : कान्हळगाव / सिरसोलीच्या लेकींनी जिल्हास्तरावर विजयाची पताका रोवली. या यशाने गावात उत्साहाचे वातावरण आहे. ओसंडून वाहणाºया आनंदाच्या प्रवाहाला अनेकांनी मदतीचा हात समोर केला आहे. शरीराची झीज, ऊर्जा टिकविण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणे हितकारक असते. स्पर्धेत सहभाग घेणाºया सर्व मुलींना प्रोटीनयुक्त आहार मिळाले पाहिजे. यासाठी गावातील पालकांसह अनेकांनी येणाºया खर्चाचा खारीचा वाटा उचलला आहे.
शरीरात प्रोटीनयुक्त आहाराची कमतरता असताना गरीब मुली सातत्याने खेळत असतात. असा संदर्भ देणारी बातमी लोकमतमध्ये झळकली. या बातमीचा परिणाम झाला. नवप्रभात हायस्कुल कान्हळगाव येथे शाळेचे शिक्षक, पालक, गावातील हितचिंतक यांची सभा २३ सप्टेंबर रोजी घेण्यात आली. या सभेला नवप्रभात हायस्कुलचे मुख्याध्यापक मार्तंड कापगते, क्रीडा शिक्षक वेदांत साखरे, राजकुमार लिंगायत, देवेंद्र कोकुडे, प्रतीक्षा बंसोडे, रोहिणी फेंडर, प्रशिक्षक गणेश ठवकर, राकेश ठवकर, मदन दमाहे, शंकर शेंडे, प्रकाश लिल्हारे, विजय शेंडे, वसंत निमकर, सरिता निंबार्ते, सुरेखा ठवकर, रमेश तितीरमारे, विलास वहिले, बिसन सार्वे, जयदेव लुटे, ज्योती कुथे, गीता उके, कैलाश डोबनुके, विनायक बोबडे, राजकुमार बांते आदींची उपस्थिती होती. सकाळ, संध्याकाळ मुली मैदानावर येतात. कबड्डी खेळाचा सराव करताना घाम गाळतात. शरीरातील ऊर्जा कमी होते.
मुलींना अतिरिक्त ऊर्जा प्रोटीन युक्त वस्तू दिले तर त्यांच्या खेळण्याची क्षमता अधिक वाढेल याचे महत्व उपस्थितांना पटवून देण्यात आले. प्रथमच गावातील नवप्रभात हायस्कुल कान्हळगावच्या मुलींनी वयोगट १४ व १७ कबड्डी स्पर्धेत विभागस्तरावर जाण्याचा इतिहास घडविला. याचा अभिमान पालकांना तसेच गावातील जनतेसह शाळेला झाला आहे. राज्य पातळीवर झेप घ्यावी, त्यांनी गावाची पताका राज्यात रोवावी अशीच सर्वांची आकांक्षा सभेत दिसून आली. जिल्ह्यातील विजयाने पालक, गावकरी प्रेरीत झाले. इथूनच लेकींच्या पुढच्या विजयाच्या प्रोत्साहनाचे बळ मिळू लागले आहे. गडचिरोली येथे २९ सप्टेंबर रोजी विभागीय कबड्डी स्पर्धा खेळायला जाणाºया मुलींच्या संघाला आठवडाभर प्रथीनेयुक्त धान्य, फळे, दूध देण्यात यावा असा निर्णय झाला. उपस्थितांनी इच्छेनुसार १०० रुपयापासून ते ५०० रुपयांच्या मदतीचा हात देवून खारीचा वाटा उचलला.
सात आठ हजार रुपये प्रोटीनयुक्त आहारासाठी जमा होणार आहेत. शाळेला कोणताही क्रीडा अनुदान मिळत नाही. तरीही शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रवास व इतर खर्चासाठी दहा हजार रुपयाचा वाटा उचलणार आहेत. खारीच्या वाट्याच्या मदतीच्या बळावर उत्तूंग झेप घेण्यासाठी कान्हळगाव नवप्रभातच्या मुली तयार आहेत.