भंडारा येथे ‘शेपिंग यंग माइंड्स’ सेमिनारचा अनेकांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 01:18 AM2019-06-07T01:18:11+5:302019-06-07T01:18:49+5:30

इयत्ता बारावीसह पदवी परीक्षेचेही निकाल लागणे सुरू झाले आहे. निकालानंतर यशस्वी करियरसाठी कोणती दिशा निवडायची याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्येही संभ्रमावस्था असते. विद्यार्थी व पालकांची ही अवस्था दूर करणारे व त्यांना यशस्वी ध्येपूर्ती गाठण्यासाठी 'लोकमत'तर्फे करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Many people benefit from 'Shaping Young Minds' seminar held at Bhandara | भंडारा येथे ‘शेपिंग यंग माइंड्स’ सेमिनारचा अनेकांनी घेतला लाभ

भंडारा येथे ‘शेपिंग यंग माइंड्स’ सेमिनारचा अनेकांनी घेतला लाभ

Next
ठळक मुद्देलोकमतचा उपक्रम : विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती लक्षणीय

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : इयत्ता बारावीसह पदवी परीक्षेचेही निकाल लागणे सुरू झाले आहे. निकालानंतर यशस्वी करियरसाठी कोणती दिशा निवडायची याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्येही संभ्रमावस्था असते. विद्यार्थी व पालकांची ही अवस्था दूर करणारे व त्यांना यशस्वी ध्येपूर्ती गाठण्यासाठी 'लोकमत'तर्फे करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मोटिव्हेशनल स्टीकर्स व स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ तथागत मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी लोकमतचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला तथा दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना करिअरची दिशा ठरविणारे मार्गदर्शन केले. नागरी सेवेत करीअर करण्यासाठी आवश्यक युपीएससी, एमपीएससी आदी परीक्षांसह एअरफोर्स आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये कसे यशस्वी व्हायचे, याबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही सत्रातील करियरमध्ये यशस्वी ध्येयपूर्तीकडे वाटचाल करण्यासाठी पॅशन, समर्पण आणि कटिबद्धता आवश्यक असते.
सोबतच कौशल्यपूर्ण कार्य अचुकतेसह अंमलबजावणी करण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन सांभाळणे तेवढेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या मनात असलेले प्रश्न त्यांनी मार्गदर्शकाला विचारले. त्यांच्या प्रश्नाचे निरासरण करताना मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात उपलब्ध असलेले करियर, त्याकरिता लागणारे शिक्षण याबद्दल पुरेपूर माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललित घाटबांधे तर, आभार संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमात आर.एम. पटेल महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Many people benefit from 'Shaping Young Minds' seminar held at Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.