कोरोना काळात डोन्टवरी व्हाॅट्सॲप ग्रुपचा अनेकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:32 AM2021-04-26T04:32:24+5:302021-04-26T04:32:24+5:30

भंडारा जिल्ह्याची एकंदरीत कोरोना परिस्थिती बघता आतापर्यंत जिल्ह्यातील ६७२ लोकांना कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४८ हजार ५५१ ...

Many support the Dontwari WhatsApp group during the Corona era | कोरोना काळात डोन्टवरी व्हाॅट्सॲप ग्रुपचा अनेकांना आधार

कोरोना काळात डोन्टवरी व्हाॅट्सॲप ग्रुपचा अनेकांना आधार

Next

भंडारा जिल्ह्याची एकंदरीत कोरोना परिस्थिती बघता आतापर्यंत जिल्ह्यातील ६७२ लोकांना कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ४८ हजार ५५१ लोकांना कोरोना संक्रमित झाले आहे. आज जिल्ह्यात जनतेला बेड, ऑक्सिजन व्हेंटिलेटर मिळेनासे झाले आहेत. अनेकजण तडफडून मरत आहे.

अशा परिस्थितीत घरी राहून लोकांना मदत कशी करता येईल यासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले कोरोना काळात आतापर्यंत ४ वेळा रक्तदान करून गरजूंना मदत करणारे वैभव बावनकर यांनी डोन्टवरी नावाचा व्हाॅट्सॲप ग्रुप बनविला. यासाठी मित्र अनिकेत मते, शुभम मोदनकर, वैभव ढेंगे, अंकुश कुलरकर, योगेश बावनकर, श्रीकांत कातोरे, अखिल मुंडले या मित्रांना सोबत घेऊन डोन्टवरी नावाचा व्हाॅट्सॲप ग्रुप बनविला. कोरोनामुळे घाबरलेल्या रुग्णांना व नातेवाइकांना हिंमत व मदत देण्याचे काम हा व्हाॅट्सॲप ग्रुप करीत आहे. रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाइकांना व नागरिकांना याचा फायदा होत आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील युवक तरुण असून, वेळोवेळी लागेल त्याला मदत करीत आहेत त्याचा अनेकांना फायदादेखील झालेला आहे व होत आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढले असून, जवळचे रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याने नातेवाईक व नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. तेव्हा नकारात्मक माहिती लोकांपर्यंत न पोहोचविता अनेक घडणाऱ्या सकारात्मक बातम्या या व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर व्हायरल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांची हिंमत व मनोबल वाढले असून, या व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था कुठे आहेत. कोणत्या मेडिकलमध्ये औषधी मिळेल याची माहितीदेखील देण्यात युवक मदत करतात. रक्तदात्यांची माहितीदेखील या ग्रुपमध्ये दररोज दिली जाते. गरजू लोकांनादेखील याचा फायदा होत आहे. रेमडेसिविर कुठे व किती उपलब्ध आहे याची माहिती, भंडारा ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत सिटीस्कॅन करून मिळत असल्याची माहितीदेखील या ग्रुपवर देण्यात येत आहे. ऑक्सिजन उपलब्ध झाला असता त्याचे वाटप कुठे आणि कसे होईल हे ग्रुपच्या माध्यमातून दिली जाते आहे. या व्हाॅट्सॲप ग्रुपमधील अनेकांना आपण गरजूंना मदत केल्याचा आनंद मिळत असून, कोरोना काळात माणुसकी जपण्याचे समाधान काही वेगळेच असल्याचे वैभव बावनकर यांनी सांगितले.

Web Title: Many support the Dontwari WhatsApp group during the Corona era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.