मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:20+5:302021-02-05T08:42:20+5:30

२८ लोक २७ के भंडारा : येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारीदरम्यान ...

Marathi language conservation fortnight concludes | मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप

Next

२८ लोक २७ के

भंडारा : येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा १४ ते २८ जानेवारीदरम्यान उत्साहात पार पडला. मराठी विभाग, ग्रंथालय व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रंथ प्रदर्शनी, राष्ट्रस्तरीय निबंध स्पर्धा व प्रश्नमंजूषा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करून पंधरवडा कार्यक्रमाचा प्रारंभ केला. या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेत राज्यभरातून सुमारे १२५ निबंध सादर झाले. मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल २८ जानेवारीला महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयाची विद्यार्थिनी रविना राजेश बनसोड हिचा प्रथम क्रमांक आला. तिला प्रमाणपत्र व रुपये ३००० हजार असे पारितोषिक प्राप्त झाले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, प्रमाणपत्र व रुपये २००० निर्मिती राजकुमार देवलसी, बिंझाणी महिला महाविद्यालय, नागपूर हिला तर तृतीय क्रमांकाची मानकरी समीक्षा उत्तम भोगे जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा ठरली. तिला प्रमाणपत्र व रुपये १००० असे पारितोषिक प्राप्त झाले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रश्नमंजूषा घेण्यात आली. यात राज्यभरातून सुमारे ७०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. समारोपीय कार्यक्रम प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. त्यांनी शुभेच्छा देत विजेत्या स्पर्धकांचे कौतुक केले. समारोपीय कार्यक्रमाला गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पणीकर मराठी विभागप्रमुख, प्रा. सुमंत देशपांडे, ग्रंथपाल, कुमारी मोना येवले सांस्कृतिक विभागाच्या प्रभारी, डॉ. अपर्णा यादव, रासेयो कार्यक्रम अधिकारी भोजराज श्रीरामे, निबंध स्पर्धा संयोजक डॉ. उज्वला बंजारी प्रश्नमंजूषा स्पर्धा संयोजक प्रा. ममता राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी डॉ. रोमी बिस्ट, डॉ. श्याम डफरे, डॉ. वीणा महाजन, डॉ. शलील बोरकर, डॉ. पद्मावती राव, संजय मेश्राम यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Marathi language conservation fortnight concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.