मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:06+5:302021-01-18T04:32:06+5:30

भंडारा : जे.एम. पटेल महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन ...

Marathi language conservation fortnight inauguration | मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उद्घाटन

Next

भंडारा : जे.एम. पटेल महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे उद्घाटन १४ जानेवारीला प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनीचेही उद्घाटन प्राचार्यांनी केले. ग्रंथप्रदर्शनात अनेक दुर्मीळ ग्रंथ, विश्वकाेष, संस्कृती व अन्य साहित्यकृतीचा समावेश करण्यात आला होता.

उद्घाटनपर भाषणात प्राचार्य ढोमणे यांनी मराठी भाषेचा गौरव करताना म्हटले, ‘मराठी भाषा ही आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. त्याचे वेगळेपण जोपासण्यासाठी मराठी ग्रंथ व साहित्याचे

वाचन वाढावे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील ‘अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे’ समन्वयक, डॉ. कार्तिक पनिकर यांनी आपल्या भाषणातून भाषा व संस्कृती यांच्या समन्वय प्रगाढ आहे. हा समन्वय टीकावयाचा असेल तर भाषेचे संवर्धन अत्यंत

महत्त्वाचे आहे, असे विचार व्यक्त केले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. सुमंत देशपांडे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. उज्ज्वला वंजारी यांनी मानले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त पदवी आणि पदवीधर महाविद्यालयीन

राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा ही ‘मराठी भाषा संवर्धन : काळाची गरज’ या विषयावर आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक ३०००, द्वितीय पारितोषिक २०००, तृतीय पारितोषिक

१००० रुपये ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर ‘मराठी भाषा व्यवहार व साहित्य’ या विषयावर प्रश्नमंजूषाचे

आयोजन दिनांक २५ ते २८ जानेवारीदरम्यान ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे.

प्रश्नमंजूषेत सहभागींना आकर्कष प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

कार्यक्रमासाठी प्रा. ममता राऊत,डॉ. श्याम डफरे,डॉ. एस. डी. बोरकर,डॉ. निशा पडोळे, डॉ. अपर्णा यादव, प्रा. भोजराज श्रीरामे, डॉ. रोमी बिष्ट, डॉ. विजया कन्नाके, डॉ. पद्मावती राव, डॉ. वीणा महाजन, ग्रंथपाल मोना येवले, सहायक ग्रंथपाल किरण डोळस यांनी

सहकार्य केले.

Web Title: Marathi language conservation fortnight inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.