भंडाºयात स्वच्छता जनजागृतीसाठी मॅरेथॉन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:14 PM2017-10-02T23:14:41+5:302017-10-02T23:14:55+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याअंतर्गत स्वच्छता जनजागृतीसाठी लॉयन्स क्लब व वैनगंगा संस्थेच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
मॅरेथॉन स्पर्धेला नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी झेंंडी दाखवून सुरूवात केली. त्यानंतर क्रिडा संकुलात आमदार डॉ. परिणय फुके, जिल्हा पोलिस अधीक्षक विनीता साहू यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांनतर गांधी चौकात महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून बाजारात स्वच्छता अभियानाचा समारोप करण्यात आला.
यावेळी आ.परिणय फुके म्हणाले, केवळ फोटो काढण्यापुरते स्वच्छता नको, आपण कचरा साफ केल्यामुळे भविष्यात कचरा करू नये, याची आपल्याला जाणीव होते व पुढे आपण कचरा करत नाही.
नगराध्यक्ष सुनिल मेंढे म्हणाले, सर्व नगरसेवक, शहरातील सर्वसामान्य नागरिक व नगर परिषद कर्मचाºयांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे शहर स्वच्छ झाल्याचे संगितले व पुढेही आपले शहर असेच स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहिले पाहिजे तेव्हाच आपण महात्मा गांधीजीच्या स्वप्नातील भारत साकारू शकू असे आवाहन करून सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी उपाध्यक्ष कवलजितसिंग चढ्ढा, डॉ.उल्हास फडके, मुकेश थानथराटे, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, कैलास तांडेकर, मंगेश वंजारी, संजय कुंभलकर, आशिष गोंडाणे, नितीन धकाते, रोशनी पडोळे, चंद्रकला भोपे, साधना त्रिवेदी, वनिता कुथे, गीता सिडाम, व संतोष त्रिवेदी, राजेश टिचकुले, मनोज बोरकर, अजय ब्राम्हणकर, दीपक थोटे, अनुप ढोके, अल्पेश कोहाडे उपस्थित होते.