वन्य प्राण्यांचा माेर्चा नर्सरीतील पऱ्हांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:40+5:302021-07-07T04:43:40+5:30

बाॅक्स धान बियाणे घेण्यासाठी पैसेच नाहीत काेराेना आणि नैसर्गिक संकटाने शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत. आता वन्यप्राण्यांमुळे नर्सरी उद्ध्वस्त ...

Marche of wild animals on nursery parhas | वन्य प्राण्यांचा माेर्चा नर्सरीतील पऱ्हांवर

वन्य प्राण्यांचा माेर्चा नर्सरीतील पऱ्हांवर

Next

बाॅक्स

धान बियाणे घेण्यासाठी पैसेच नाहीत

काेराेना आणि नैसर्गिक संकटाने शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत. आता वन्यप्राण्यांमुळे नर्सरी उद्ध्वस्त हाेत आहे. दुबार पेरणी करावी तर धानाचे बियाणे विकत घ्यावे लागत आहे. आधीच उधार उसनवार करून पेरणी केली हाेती. आता तर शेतकऱ्यांजवळ बियाणे विकत घेण्यासाठी पैसेही नाहीत. त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी हाेत आहे.

दीडशेवर शेतकऱ्यांचे नुकसान

पवनी तालुक्यातील भाेजापूर सिंधी परिसरातील दादाजी वैद्य, मूलंचद वैद्य, ज्ञानेश्वर वैद्य, सेवक काेरेकर, नंदलाल पडाेळे या शेतकऱ्यांनी आपली आपबीती सांगितली. त्यांच्यासह परिसरातील दीडशे शेतकऱ्यांच्या नर्सरीचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले आहे.

काेट

वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या धान नर्सरीची वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, शेतात प्रत्यक्ष चाैकशी करावी, तसेच रानडुकरांपासून शेतकऱ्यांचा शेतमाल वाचविण्यासाठी उपाययाेजना करावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील.

गंगाधर लकडस्वार, माजी सरपंच भाेजापूर सिंधी.

Web Title: Marche of wild animals on nursery parhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.