मऱ्हेगावची शाळा कोरोना संकटातही नियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:37 AM2021-09-03T04:37:02+5:302021-09-03T04:37:02+5:30
मुख्याध्यापक प्रकाश भोंडे व पदवीधर शिक्षक सतीश वासनिक यांनी योग्य नियोजन करून सेतू अभ्यास, शाळेबाहेरील शाळा उपक्रम, स्वाध्याय उपक्रम, ...
मुख्याध्यापक प्रकाश भोंडे व पदवीधर शिक्षक सतीश वासनिक यांनी योग्य नियोजन करून सेतू अभ्यास, शाळेबाहेरील शाळा उपक्रम, स्वाध्याय उपक्रम, कोरोना त्रिसूत्रीचा वापर करून वर्गावर्गाचे गटनिहाय वर्गखोली, समाजमंदिर विहारात, अंगणवाडी केंद्रात विद्यार्थ्यांकडून मोबाइलमध्ये सोडवल्या जात आहे. स्कालरशिप व नवोदय वर्गाचे नियोजन सहायक शिक्षिका जयश्री चेटुले व सहायक शिक्षक ज्ञानेश्वर कळंबे यांच्या मार्गदर्शनात ऑफलाइन व ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. वृक्षारोपण कार्यक्रम जेष्ठ शिक्षिका पौर्णिमा रामटेके व विनोद चारमोडे सहायक शिक्षक यांच्या मार्गदर्शनात लोकवर्गणीतून स्वातंत्र्यदिनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात आले. शाळेची पटसंख्या दरवर्षी वाढत असून शाळा उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदासाठी पात्र ठरली आहे. शाळेच्या विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष युवराज शेंडे, उपाध्यक्ष, सदस्य तथा विद्यार्थी, पालकवर्ग यांचे सहकार्य लाभत असते.