पणन विभागाचा बारदाणा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:06+5:302021-09-24T04:41:06+5:30

कोट पणन विभागाची जबाबदारी मनोहर राऊत शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांना जिल्हा पणन विभागाद्वारे बारदाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाच्या ...

Marketing department's scam | पणन विभागाचा बारदाणा घोटाळा

पणन विभागाचा बारदाणा घोटाळा

Next

कोट

पणन विभागाची जबाबदारी

मनोहर राऊत शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांना जिल्हा पणन विभागाद्वारे बारदाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना स्वत: बारदाणा उपलब्ध करण्यासाठी प्रवृत्त केले होते. दरम्यान, शेतकऱ्यांद्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या बारदाण्यांची राशी शासनाद्वारे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पणन विभाग जबाबदार आहे. -मनोहर राऊत, माजी सदस्य, जिल्हा परिषद

कोट बारदाणाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट

सुरेश ब्राम्हणकर पणन विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना जबरदस्ती करून स्वत:चा बारदाणा उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले. आधारभूत धान खरेदी केंद्रांना बारदाणा उपलब्ध करण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे. मात्र, स्वत:ची जबाबदारी टाळून शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी बारदाणा उपलब्ध करण्याचा आग्रह केला.

-डॉ. सुरेश ब्राह्मणकर, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती

Web Title: Marketing department's scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.