बाजारपेठा हाऊसफुल्ल

By Admin | Published: October 29, 2016 12:32 AM2016-10-29T00:32:35+5:302016-10-29T00:32:35+5:30

दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, ...

Marketplace Housefull | बाजारपेठा हाऊसफुल्ल

बाजारपेठा हाऊसफुल्ल

googlenewsNext

दिवाळीत खरेदीची धूम : दागिने व ब्रॅण्डेड वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल
भंडारा : दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, नवी आशा, नवा हुरूप दिसत आहे. महागाई वाढली असली तरी त्याची कुठलीही छाया दिवाळीच्या खरेदीवर पडली नसल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत, फर्निचरपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतच्या विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. दिवाळीत सर्वच बाजारपेठांमध्ये खरेदीची धूम आहे.
बाजारात रेडिमेड कपड्यांच्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नाही. रांगोळ्या, आकाशदिवे, मातीचे दिवे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. धनत्रयोदशीला नवीन वाहन घरी नेण्यासाठी ग्राहकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये गर्दी दिसत आहे. फटाक्यांची दुकानेही शहरात सजली आहेत. उल्लेखनीय म्हणजे काही नवीन प्रकारचे प्रदूषणमुक्त फटाके यंदा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
साईराज मोटर्सचे संचालक राजेंद्र बन्सोड यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता शोरूममध्ये जाऊन वस्तू हाताळून खरेदी करण्याकडे लोकांचा ओढा दिसून येत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता जास्त स्टॉक करावा लागत आहे.
फायनान्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गुणवत्तेच्या उत्पादनांना ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. रोकडे ज्वेलर्सचे संचालक चंद्रशेखर रोकडे तथा नक्षत्र ज्वेलसर्च संचालक तुषार काळबांधे यांनी सांगितले की, यंदा ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दागिन्यांना मागणी आहे.
ग्राहक कुटुंबीयांसह खरेदीसाठी येत आहेत. श्रीराम इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक साठवणे यांनी सांगितले की, दिवाळीला एक दिवस उरलेला आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी येत आहेत. लोकांना ब्रॅण्डेड वस्तू हव्या आहेत. विविध आॅफर्ससह फायनान्सची सुविधा उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची खरेदी वाढली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Marketplace Housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.