ग्रीनफ्रेंड्सतर्फे मंगळ- चंद्र दुर्मीळ पिधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:32 AM2021-04-19T04:32:30+5:302021-04-19T04:32:30+5:30
कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा, नेफडो जिल्हा भंडारा व एपीजे अब्दुल ...
कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका शाखा लाखनी व जिल्हा शाखा भंडारा, नेफडो जिल्हा भंडारा व एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, जिल्हा भंडाराचे सहकार्य लाभले. यावेळी ग्रीनफ्रेंड्सचे संघटक प्रा. अशोक गायधने यांनी सुरुवातीला मंगळ-चंद्र पिधान युती घडून येण्याची कारणमीमांसा केली. त्यानंतर पावणेसहा वाजता मंगळाने चांद्रबिंबाआड प्रवेश केला असून, तो दोन तासांनी बाहेर पडण्याचा कालावधी आहे, अशी माहिती पुरविली. दरम्यानच्या काळात चांद्रबिबाचे दुर्बीण टेलिस्कोपद्वारा दर्शन घडवून चंद्राच्या विविध भागांची माहिती; यात तेथील विवरे, त्यांची विविध इंग्रजी नावे यांविषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी अशोक वैद्य, पंकज भिवगडे, अथर्व गायधने, प्रज्ज्वल भांडारकर, अर्णव गायधने, ओम आगलावे, प्रा. अर्चना गायधने, आरू आगलावे, सुमित्रा गायधने यांनी कोरोनाचे नियम व सामाजिक अंतर पाळून सहभाग नोंदविला.