शहीद प्रफुल मोहरकर यांच्या अस्थींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 10:27 PM2018-12-23T22:27:04+5:302018-12-23T22:28:14+5:30

पाकिस्तानने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. नगर पालिकेचे अध्यक्ष तत्कालीन मुख्याधिकारी आणि भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी पवनी नगरात वर्षभरात हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे स्मारक उभारले जाईल अशी घोषणा केली.

Martyrdom of Shaheed Praful Moharkar's Bones | शहीद प्रफुल मोहरकर यांच्या अस्थींचे विसर्जन

शहीद प्रफुल मोहरकर यांच्या अस्थींचे विसर्जन

googlenewsNext
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींना विसर : नगर परिषदेतून अस्थी आणल्या परत

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : पाकिस्तानने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. नगर पालिकेचे अध्यक्ष तत्कालीन मुख्याधिकारी आणि भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार यांनी पवनी नगरात वर्षभरात हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे स्मारक उभारले जाईल अशी घोषणा केली. मात्र वर्ष लोटल्यावरही आश्वासनाची पूतर्ता न झाल्याने शहीद मोहरकर यांच्या अस्थींचे त्यांच्या कुटुंबियांनी वैनगंगा नदीत विसर्जन केले.
स्थानिक विकास निधीमधून २१ लाख रूपये देण्यात येतील असे आमदारांनी घोषणा केली होती. वर्ष उलटले स्मारकासाठी निधी नाही व जागा देखील निश्चित करण्यात आली नाही. स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व नेते स्मारक निर्मितीसाठी किती गंभीर आहेत? हे लक्षात येते.
मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या अस्थी नगरपरिषद कार्यालयामध्ये सन्मानपूर्वक ठेवण्यात आल्या होत्या परंतु संपूर्ण वर्षभरात नेत्यांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाची अजिबात आठवण राहिली नाही. त्यामुळेच आज वर्ष पूर्ण होऊनही या स्मारकासाठी साधी जागाही निश्चित होऊ शकली नाही. हुतात्मा मेजर प्रफुल मोहरकर हे जिल्ह्यातील पवनी तालुक्याचे सुपुत्र असल्यामुळे त्यांनी देशासाठी दिलेला बलिदान सदैव पवनीकरांचे लक्षात रहावे आणि येणाऱ्या तरुण पिढीला मेजर मोहरकर हे आदर्श रहावे, यासाठी नगरपरिषद तर्फे त्यांचा स्मारक उभारू, असे नगराध्यक्ष पूनम काटेखाये, तत्कालीन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी मोहरकर यांच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबांना आश्वासन दिले व अस्थी कलश ताब्यात घेण्यात आले. स्मारकासाठी आमदार रामचंद्र अवसरे यांनी निधीची घोषणा केली. अस्थीकलश मुख्याधिकारी यांच्या कक्षात असूनही नगराध्यक्षा किंवा पदाधिकारी यांनी सभेमध्ये हा विषय चर्चेला आणलाच नाही.

Web Title: Martyrdom of Shaheed Praful Moharkar's Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Soldierसैनिक