शहिदांचे बलिदान व्यर्थ जात नाही
By admin | Published: October 28, 2016 12:29 AM2016-10-28T00:29:59+5:302016-10-28T00:29:59+5:30
सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहेत.
श्रद्धांजली : लखन बर्वे यांचे प्रतिपादन
साकोली : सिमेवर तैनात सैनिकांमुळे देश सुरक्षित आहे तर पोलिसांमुळे नागरिक सुखाने जीवन जगत आहेत. शहिदांमुळेच सर्वांचे जीवन व स्वतांत्र्य अबादित आहे. धर्मापुरी येथील जि.प. प्राथमिक शाळेत १९६८ ला चौथीपर्यंत शिकलेले शहीद पोलीस उपनिरीक्षक स्व. दिपक सखाराम रहिले यांचे उपकार कुणीही विसरू शकत नाही. त्यांचे कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहेत. देशाच्या सेवेचा त्यांचा ध्येय होता. ज्या-ज्या शहीदांनी जिवाची पर्वा न करता बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही, असे प्रतिपादन पं.स. उपसभापती लखन बर्वे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धर्मापुरी येथे आयोजित शहिदांना श्रद्धांजली या कार्यक्रमात उपसभापती लखन बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली साकोलीचे पोलीस निरीक्षक गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन, डॉ. वंजारी, डॉ. हेडाऊ, सरपंच शिवणकर, शाव्यास अध्यक्ष नरेंद्र खोटेले, पोलीस पाटील वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य रूपचंद खोटेले व अन्य उपस्थित होते.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की, शहिदांनी केलेले उपकरांची परतफेड करता येत नाही. मात्र त्यांचे कार्य सदैव स्मरणात ठेवून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालविण्याचे कार्य नागरिकांनी केले पाहिजे. यावर्षी संपूर्ण देशातून ४७३ पोलीस अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावित असतानी आपल्या मातृभूमिच्या संरक्षणार्थ प्राणाची आहूती दिली आहे. कर्तव्य पथावर अग्रेसर होत असता हौताम्य, पत्करणाऱ्या वीर पोलीस जवानांची आठवण म्हणून संपूर्ण देशभर पोलीस प्रशासनतर्फे २१ आॅक्टोबर हा हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
कार्यक्रमाचे संचालन व्ही.के. वाघाळे यांनी तर आभार शिक्षिका टिचकुले यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिक, विद्यार्थी हजर होते. याप्रसंगी शहीद रहिले यांच्या जिवनावर विद्यार्थ्यांसह अनेकांनी प्रकाश टाकला. (तालुका प्रतिनिधी)