मारुती व्हॅनला आग लागून गॅस किटचा स्फोट; लाखनी येथील उड्डाण पुलाजवळील घटना
By ज्ञानेश्वर मुंदे | Updated: December 29, 2022 15:21 IST2022-12-29T15:20:12+5:302022-12-29T15:21:51+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील थरारक घटना

मारुती व्हॅनला आग लागून गॅस किटचा स्फोट; लाखनी येथील उड्डाण पुलाजवळील घटना
लाखनी (भंडारा) : येथील राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाजवळ केसरवाडा फाट्याजवळ मारुती व्हॅनला अचानक आग लागली व त्यामध्ये असलेल्या गॅस किटचा स्फोट झाल्याचा थरार लोकांनी अनुभवला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
लाखनी वरून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मारुती व्हॅन क्रमांक एम एच ३१/सी एस /६२९५ ला शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली. चालक प्रशांत चंद्रहास चाचेरे हा गाडी खाली उतरला त्यानंतर आगीचा डोंब उसळला. गाडीतील गॅस किटचा स्फोट झाला. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी पाचारण करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार मिलिंद तायडे व नीरज साबळे करीत आहेत.