मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:37 AM2021-07-27T04:37:20+5:302021-07-27T04:37:20+5:30
बॉक्स मास्क आवश्यक, पण त्वचेचे असे करा रक्षण सर्वप्रथम, आरामदायक आणि श्वास घेणारा मास्क वापरणे महत्त्वाचे आहे. सुती ...
बॉक्स
मास्क आवश्यक, पण त्वचेचे असे करा रक्षण
सर्वप्रथम, आरामदायक आणि श्वास घेणारा मास्क वापरणे महत्त्वाचे आहे. सुती कपड्याने बनलेला मुखवटा घाला. मुखवटा फॅब्रिकच्या तीन थरांनी बनलेला असावा, त्याने आपले नाक आणि तोंड चांगले झाकले पाहिजे आणि ते फारच घट्ट किंवा खूप सैल नसावे. असे केल्याने मास्क परिधान करताना त्वचेची जळजळ आणि जास्त घाम येणे टाळण्यास मदत होते.
कोट
त्वचाविकाराचे रुग्ण वाढले
कोरोनाच्या काळात मास्कचा अधिक वापर व येणारा घाम यामुळे त्वचेचे आजार वाढले आहेत. एकच-एक मुखवटा न वापरता मास्क बदलत जावे.
- डाॅ. प्रमेश गायधने, गोंदिया
कोरोनाच्या काळात मास्कचा वाढलेला वापर आणि त्वचेवर येत असलेली खाज कमी करण्यासाठी एकाच मास्कचा वापर वारंवार करू नये. दररोज मास्क बदलावे. कापडाचे मास्क वापरत असाल तर ते स्वच्छ धुवून वाळविल्यानंतर वापरावे.
-डॉ. संजय देशमुख,
साखरीटोला त्वचाविकाराचे रुग्ण वाढले