मास्कने लिपस्टिकची लाली घालविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:44 AM2021-04-30T04:44:28+5:302021-04-30T04:44:28+5:30

जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर कॉस्मेटिकसह ब्युटीपार्लर व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला होता. मात्र, त्यानंतर आता संपूर्ण राज्यात ...

The mask removed the redness of the lipstick | मास्कने लिपस्टिकची लाली घालविली

मास्कने लिपस्टिकची लाली घालविली

Next

जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यानंतर कॉस्मेटिकसह ब्युटीपार्लर व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर आला होता. मात्र, त्यानंतर आता संपूर्ण राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने ब्युटीपार्लर व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यातही कोरोना झपाट्याने वाढत आहे. त्याचाच परिणाम अनेक महिला कामाशिवाय घराबाहेर पडत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यास बंदी असल्याने दुकाने उघडल्यास नगर परिषदेतर्फे कारवाई करण्यात येते. त्यामुळे कोरोनाकाळातील लग्नसमारंभ पंचवीस जणांच्या उपस्थितीत व प्रशासनाची पूर्वसंमती घेणे आवश्यक आहे. याचाच परिणाम लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांवर होत आहे. त्यामुळे महिला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास टाळत आहेत. त्यामुळे कॉस्मेटिकसह ब्युटीपार्लरचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

बॉक्स

२४ तास घरांतच; ब्युटी पार्लर हवे कशाला

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर लक्षात घेता अनेक लग्नसमारंभ, साक्षगंधचे कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे आता ब्युटिपार्लर चालकांनी अनेकांकडून घेतलेले ॲडव्हान्स पेमेंटही परत करणे कठीण होत आहे. संचारबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यातच कॉस्मेटिकची दुकाने बंद असल्याने साहित्य मिळणेही कठीण झाले आहे. नागपूर गेल्या काही दिवसापासून बंद ठेवण्यात आल्याने नागपूरलाही जाता येत नसल्याचा फटका बसत आहे.

कोट

ब्युटी पार्लर व्यवसाय अत्यावश्यक सेवेत येत नसल्याने अनेक दिवसापासून बंद आहेत. संचारबंदी लागण्याआधी आम्ही लग्नाच्या ऑर्डर घेतल्या होत्या. मात्र आता अनेक लोकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत, तर काहींनी रद्द केले आहेत. ऐन लग्नसराईतच कोरोना वाढल्याने आमच्या व्यवसायाला मोठे नुकसान होत आहे.

ब्युटी पार्लर चालक, महिला.

कोट

भंडारा शहरात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे ब्युटी पार्लरची दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. एकीकडे व्यवसाय ठप्प झाला आहे. तर दुसरीकडे दुकानातील साहित्यही कालबाह्य होत असल्याने खरेदी केलेल्या मालाचे पैसे फेडायचे कशाने, अशी आर्थिक विवंचना तसेच घर चालवताना आम्हाला संघर्ष करावा लागत आहे.

हिना शेख,

कॉस्मेटिक विक्रेता

कोट

घरीच करतो आम्ही मेकअप

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आम्ही घराबाहेर पडत नाही. ब्युटीपार्लरही बंद आहेत. शिवाय घराबाहेर जावे लागत असल्याने ऑनलाईन माहिती घेत घरीच काही शृंगार करून आम्ही मेकअप तयार करायला शिकलो आहोत.

सेलोकर, महिला.

कोट

संपूर्ण दिवस जातो घरातच

संचारबंदी असल्याने महिलांना घराबाहेर जाणे जमत नाही. त्यामुळे आम्ही घरातच बसत आहेात. याशिवाय अनेक कार्यक्रम लग्न रद्द झाले आहेत. एखादा कार्यक्रम असला तरी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडला जात आहे. त्यामुळे अनेकांना ब्युटीपार्लरमध्ये जाऊन शृंगार करणे तसेच विविध साहित्याची खरेदी करण्याची फारशी गरज वाटत नाही.

प्रेरणा कंगाले, महिला

Web Title: The mask removed the redness of the lipstick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.