बांधकाम कार्यालयातून संगणकासह साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:06+5:302021-01-08T05:55:06+5:30

साकोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी संगणक संचासह ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ...

Material lamps with computers from the construction office | बांधकाम कार्यालयातून संगणकासह साहित्य लंपास

बांधकाम कार्यालयातून संगणकासह साहित्य लंपास

Next

साकोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी संगणक संचासह ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय बुधवारी नेहमीप्रमाणे बंद करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयाचे कर्मचारी ऑफीस उघडण्यासाठी गेले असता ऑफीसच्या मागच्या दाराचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला. चोरट्याने लिनिओ कंपनीचा संगणक संच, एचपी कंपनीचा संगणक, ऑल इन वन स्कॅनर प्रिंटर असा ६७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी लिखित अनिल श्रावणकर यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सावंत करीत आहेत. चोरट्यांनी आता आपला मोर्चा शासकीय कार्यालयाकडे वळविल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Material lamps with computers from the construction office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.