स्रेहलला व्हायचंय मेकॅनिकल इंजिनियर
By Admin | Published: May 28, 2015 12:36 AM2015-05-28T00:36:09+5:302015-05-28T00:36:09+5:30
इच्छा व्हायची तेव्हा अभ्यास करायचा. पण त्यात सातत्य असायचे. अभ्यास करायला वेळ पाहत नव्हतो. ...
इंद्रपाल कटकवार भंडारा
इच्छा व्हायची तेव्हा अभ्यास करायचा. पण त्यात सातत्य असायचे. अभ्यास करायला वेळ पाहत नव्हतो. आई-वडील व गुरूजनांचे मार्गदर्शन हेच माझ्या यशाचे मुख्य गमक असल्याची प्रतिक्रिया बारावीच्या परीक्षेत अव्वल आलेल्या स्रेहल रामटेके या विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला दिली. त्याची मेकॅनिकल इंजिनिअर बनन्याची इच्छा आहे.
घरात शैक्षणिक वारसा नसतानाही व आर्थिक स्थिती बेताची असतानाही अतिशय खडतर परिस्थितीत स्नेहलने हे यश संपादित केले आहे. संघर्षाला उत्कर्षाचे बळ मिळाल्यास अशक्य बाबही शक्य होत असते. ही बाब, स्रेहलने आपल्या कतृत्वाने सिद्ध करून दाखविले आहे.
स्रेहलचे बाबा मजुरीचे काम करित असून आई (किरण) अंगणवाडीत मदतनिस आहेत. त्याचे वडील ८ वी तर आई ९ वी पास आहेत.
भंडारा नजिकच्या भिलेवाडा या छोट्याशा गावातील रहिवासी असून त्याचा या यशाने जिल्ह्यासह गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आई वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. इच्छेच्या बळावर आपण यश गाठू शकतो, अशी आशा होती. मात्र जिल्ह्यात प्रथम येऊ, हा माझ्यासाठी सुखद धक्का आहे. स्रेहलला एक लहाण बहिण असून ती सातव्या वर्गात शिकत आहे.
नगर परिषद गांधी विद्यालयासह खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. स्रेहलला पाच विषयांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. स्रेहल हा ‘ट्रीपल जेई’ परिक्षेतही जिल्ह्यातून पहिला आला होता. त्याला अभियांत्रिकी विशेषत: मेकॅनिकल क्षेत्रात करिअर घडवायचे आहे.