जेएसव्ही फसवणूकप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By admin | Published: April 12, 2017 12:48 AM2017-04-12T00:48:35+5:302017-04-12T00:48:35+5:30
जेएसव्ही कंपनीने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तथा नागपूर जिल्ह्यातील लाखो गुंतवणुकदार व अभिकर्त्यांची मोठी फसवणूक करून धोका दिला.
प्रशासन नियुक्त करण्याची मागणी करणार : बच्चू कडू यांची अभिकर्त्यांना ग्वाही
तुमसर : जेएसव्ही कंपनीने भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तथा नागपूर जिल्ह्यातील लाखो गुंतवणुकदार व अभिकर्त्यांची मोठी फसवणूक करून धोका दिला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रशासक नियुक्त करण्याची हमी आ.बच्चू कडू यांनी दिली.
जेएसव्हीचे गुंतवणूकदार व अभिकर्त्यांनी आ.बच्चू कडू यांची भंडारा येथे भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. जेएसव्ही कंपनीचे कागदपत्रांची पाहणी केल्यावर येथे पाच मुख्य संचालक आहेत. त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. अमीत चौधरी, संध्या आंबेडारे, राजेंद्र भाले हे केवळ भागधारक आहेत. जमीन खरेदी विक्रीचा अधिकार त्यांना देण्यात आले होते. हे कागदपत्रानुसार स्पष्ट दिसत आहे. गुन्हा दाखल करून संचालकांना अटक करून काम चालणार नाही, गुंतवणूकदार व अभिकर्त्यांची फसवणूक झाल्याचे येथे प्रथमदर्शनी दिसत आहे. या प्रमाणात सखोल चौकशी करिता मुख्यमंत्र्यांना भेट घेण्यात येईल. अभिकर्त्यांचे प्रतिनिधी अमीत चौधरी यांना सोबत घेऊन जेएसव्ही कंपनीत प्रशासक नियुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र् यांकडे करण्यात येईल अशी ग्वाही आ.बच्चू कडू यांनी अभिकर्ते व गुंतवणुकदारांच्या बैठकीत दिली.
सेबीच्या निर्णयाचा आदर करून नियमानुसार प्रशासक बसविण्याची हमी आ.बच्चू कडू यांनी शेवटी दिली. आ. बच्चू कडू यांना यावेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अमीत चौधरी, राजेंद्र आले, सुरेंद्र बोरकर, संध्या आंबेडारे, कृष्णकुमार बिरे, योगीप्रसाद धामडे, त्र्यंबक रामटेके, भारती बांते, मुकेश नागरिकर, रुपेश सपाटे, कलावती तुरकर, संगीता इसरावत, सारंगा आगाशे, प्रमोद गोंधुळे, मारोती राजगीरे, लोकेश येळणे, सतीश भेदेसह अभिकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)