कोतवालांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार -मधुकर कुकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 09:23 PM2019-01-05T21:23:41+5:302019-01-05T21:23:59+5:30
महाराष्ट्र या पुरोगामी राज्यात कोतवाल हा गेल्या ४८ दिवसांपासून काम बंद आंदोलन करून शासनाकडे न्यायाची दाद मागू लागला आहे. तरीपण राज्य शासनाला पाझर फुटलेला नाही. तेव्हा शासनाने कोतवालांची चतुर्थश्रेणीची मागणी पूर्ण करावी, यासाठी कोतवाल संघटनेच्या आंदोलनाला पूर्णत: पाठींबा असून यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची ग्वाही खासदार मधुकर कुकडे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाराष्ट्र या पुरोगामी राज्यात कोतवाल हा गेल्या ४८ दिवसांपासून काम बंद आंदोलन करून शासनाकडे न्यायाची दाद मागू लागला आहे. तरीपण राज्य शासनाला पाझर फुटलेला नाही. तेव्हा शासनाने कोतवालांची चतुर्थश्रेणीची मागणी पूर्ण करावी, यासाठी कोतवाल संघटनेच्या आंदोलनाला पूर्णत: पाठींबा असून यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची ग्वाही खासदार मधुकर कुकडे यांनी आंदोलनस्थळी येऊन दिली.
राज्यात १२,६३७ कोतवाल कार्यरत असून त्यांना आतापावेतो मानधनावरच जीवन जगावे लागत आहे. महागाईच्या काळात ५,०१० रुपये तुटपुंजे मानधन आहे. यात कोतवालच मुलांचे शिक्षण व हजर कामे कसे करत असतील हे कठीण आहे. तेव्हा तेही माणसेच आहेत. कोतवाल हा पोलीस महसूल, ग्रामपंचायत, आरोग्य व इतर विभागाचेही कामे करतो. अशावेळी त्यांना सन्मानाने जगण्यासाठी राज्य शासनाने त्वरीत कोतवालांची मागणी पूर्णत्वास नेण्यात यावी. याकरिता येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांशी बोलून प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही खासदार कुकडे यांनी उपोषणकर्त्यांना दिली.