राज्यातील पशुसेवकाच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:45+5:302021-07-22T04:22:45+5:30

पशुसेवा समितीतर्फे परिणय फुके यांना निवेदन भंडारा : महाराष्ट्र राज्यभर सुरू असलेल्या पशुसंवर्धन पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल ...

Meet the demands of the state's pastoralists | राज्यातील पशुसेवकाच्या मागण्या पूर्ण करा

राज्यातील पशुसेवकाच्या मागण्या पूर्ण करा

Next

पशुसेवा समितीतर्फे परिणय फुके यांना निवेदन

भंडारा : महाराष्ट्र राज्यभर सुरू असलेल्या पशुसंवर्धन पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल आंदोलनाबद्दल माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ.परिणय फुके यांची पशुसेवा समिती भंडारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.

चर्चेत महाराष्ट्रात भारतीय पशुवैद्य परिषद अधिनियम आयव्हीसी ॲक्ट १९८४च्या कलम (बी) ३० कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी व पशुसेवकाला शिथिलता देण्यात यावी, गाव तिथे पशुसेवक ही संकल्पना राज्यशासनाने राज्यातील प्रत्येक गावात राबवावी, राज्यातील पशुसेवकांना पशुवैद्यकीय सेवा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

मागण्यांवर आ.डॉ.परिणय फुके यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यांनी पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याशी लवकरच वेळ घेऊन याविषयी चर्चा करू, असे आश्वासन दिले. यावेळी पशुसेवा समिती भंडारा जिल्ह्याचे राकेश सेलोकर, बाळकृष्ण राणे, गजानन भेंडारकर, प्रेमलाल नान्हे, देवानंद भुते, तोमेश्वर पडोळे, केशव बावनकर, नीलेश गाडेकर, जगदीश वाबनकर तथा भाजपयूमोचे भंडारा जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य उपस्थित होते.

Web Title: Meet the demands of the state's pastoralists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.