विविध उपक्रमांनी रंगला सखींचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:24 AM2021-02-19T04:24:31+5:302021-02-19T04:24:31+5:30

उद्घाटन नगरसेविका शुभांगी खोब्रागडे, भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक संजय कुंभलकर, बेलाच्या सरपंच पूजा ठवकर, ड्रीम योगा ॲरोबिक्स अँड झुम्बा ...

Meet Rangala Sakhi with various activities | विविध उपक्रमांनी रंगला सखींचा मेळावा

विविध उपक्रमांनी रंगला सखींचा मेळावा

Next

उद्घाटन नगरसेविका शुभांगी खोब्रागडे, भाजपा शहर अध्यक्ष नगरसेवक संजय कुंभलकर, बेलाच्या सरपंच पूजा ठवकर, ड्रीम योगा ॲरोबिक्स अँड झुम्बा फिटनेस क्लासेसच्या संचालिका मल्लीका मोहम्मद, सपना मेकअप ॲकॅडमी ॲण्ड स्कीन क्लीनिकच्या संचालिका सपना मोहिते, दीपा कलेक्शनच्या दीपा काकडे, सहयोग फायनान्सचे टीम लीडर अक्षय शेंडे, सी.जे. फायनान्सचे संचालक कुणाल गरपडे, अमजद पठाण, पूजा कुंभलकर, ज्योती दुबे, योगेश पडोळे, दीप्ती भुरे व लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांना मानवंदना देऊन करण्यात आली. यात भंडारा शहरातील विभाग प्रतिनिधी सहभागी होत्या. स्वाती सेलोकर यांनी जिजामातेची भूमिका साकारली तर शिवबाची भूमिका शनया तरोणे यांनी केली. शिवरायांवर आधारित भाषण व कवितेची सुरुवात रियांशी पडोळे हिने आपल्या बोबड्या स्वरात ‘आज शिवाजी महाराज असते नं’ अशी केली.

संक्रांत मेळाव्यात उखाणे स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक स्वाती सेलोकर, द्वितीय रंजना गभणे, तृतीय क्रमांक भावना मेंढे हिने प्राप्त केला. संक्रांत फॅशन शोमध्ये प्रीती मुळेवार प्रथम ठरली. संक्रांत सखी, द्वितीय क्रमांक स्वाती सेलोकर व तृतीय भावना मेंढे.

होम मिनिस्टर कार्यक्रम आर.जे. रोशन हुकरे यांनी पार पाडले. यात त्यांनी नाविण्यपूर्ण गेम्स घेऊन उपस्थिताना खिळवून ठेवले, तसेच त्यांच्या वाक्‌चातर्यातून त्यांनी सखींचे मनोरंजन केले. यात प्रकाशमयी ज्योती, लक्ष भेद, जीवन आधार, उंच भरारी, मनमोजी सखी व चल पुढे अशा विविध स्पर्धा घेतल्या. स्पर्धेत होम मिनिस्टरचा मान रिता हटवार यांनी पटकाविला. तर सुवर्णा दखरे, मंजू खरवार, संगीता जांभूळकर, माया वैद्य, भावना मेंढे व किरण राजगिरे, सुनंदा तईकर, मंदा कढव, प्रियंका बोरकर या विजयी ठरल्या.

कार्यक्रमाचे आयोजन व संचालन जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी केले तर आभार बालमंचचे जिल्हा संयोजक ललित घाटबांधे यांनी मानले. संध्या रामटेके, मनिषा रक्षिये, जयश्री बोरकर, मंजूषा चव्हाण, श्रद्धा डोंगरे, पूजा रक्षिये, सुहासिनी अल्लडवार, कल्पना डांगरे, आशा बाभरे, शिल्पा न्यायखोर, कल्पना आकरे, नंदा मस्के, सुषमा साखरकर, मीना साठवणे, डाॅ.पौर्णिमा फटीक, संगीता भुजाडे, मंगला क्षीरसागर, जयश्री तोडकर, मंदा पडोळे, पुष्पा साठवणे, माधुरी वाघमारे व मोहिनी लांजेवार यांनी सहकार्य केले.

Web Title: Meet Rangala Sakhi with various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.