साकोलीत विदर्भ राज्य दिंडी यात्रा विषयी सभा
By admin | Published: November 6, 2016 12:40 AM2016-11-06T00:40:32+5:302016-11-06T00:42:09+5:30
विदर्भ राज्य कोणत्याही परिस्थितीत मिळाल पाहिजे, याकरिता साकोलीत मदन रामटेके यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
साकोली : विदर्भ राज्य कोणत्याही परिस्थितीत मिळाल पाहिजे, याकरिता साकोलीत मदन रामटेके यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.
यात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले, माजी आमदार व विदर्भ कोर कमिटी सदस्य अॅड. वामनराव वंजारी, भंडारा जिल्हा अध्यक्ष वासुदेव नेवारे, तुषार हट्टेवार, अर्जून सुर्यवंशी, युवा आघाडीचे भारत चौधरी, दामोदर क्षीरसागर, जिल्हा जनरल सेक्रेटरी प्रभाकर सपाटे, जि.प. उपाध्यक्ष मदन रामटेके, तालुका महासचिव शैलेश गजभिये, जिल्हा कार्यकारिणी विदर्भ राज्य आघाडीचे सदस्य डी.जी. रंगारी, अॅड. श्रीधर सिडाम आदी उपस्थित होते.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी सभेत सांगितले की, भाजपने केंद्रात आमची सत्ता आली तर आम्ही विदर्भ राज्य देऊ असे लेखी आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. आज राज्यात व केंद्रात भाजपची सरकार असून सुद्धा विदर्भ राज्याचा ठराव आणला नाही. त्यामुळे ५ डिसेंबर २०१६ ला नागपूरच्या विधान भवनावर पहिल्याच दिवशी मोर्चा व ठिय्या आंदोलन होणार असून त्याची तयारी म्हणून विदर्भाच्या ५ सिमेवरून विदर्भ दिंडी यात्रा निघणार असून देवरी सिमेवरून पहिली दिंडी गोंदिया, गोरेगाव, तुमसर, रामटेक तर दुसरी दिंडी, गडचिरोलीची सिमा कालेश्वर येथून तर तिसरी दिंडी उमरखेड, पुसद, यवतमाळ, कळम, रायगाव येथून तर चौथी विदर्भ दिंडी शेडगाव, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर या मार्गाने तर पाचीव विदर्भ दिंडी यात्रा सिंडरवेड राजा बुलडाना, वाशिम, अकोला, हिंगनघाट या पाचही दिंड्या ५ डिसेंबरला नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे जमा होतील तेथून मोर्चा स्वरूपात विधान भवनावर धडकतील असेही सांगितले.
हा मोर्चा म्हणजे जवाब दो मोर्च आहे. यात सहा इतरही मागण्या आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य केव्हा देणार, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केव्हा करणार, उत्पादन खर्च आणि ५० टक्के नफा एवढे शेतमालाचे हमी भाव केव्हा देणार, विजेचे लोडेशडींग केव्हा संपणार, वैदर्भीय जनतेला निम्मे दरात विज केव्हा देणार, ४ लाख विदर्भीय बेरोजगारांना बॅकलॉग केव्हा भरणार या मागण्या राहणार असून अखंड महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, सत्ताधाऱ्यांनो विदर्भ देता की, जाता, अशाही नारा देण्यात आला आहे.
त्यानंतर युवा मोर्चातर्फे रक्त संदेश म्हणून युवा वर्ग आपल्या हाताच्या रक्ताने पत्र लिहून विदर्भ राज्याची मागणी पंतप्रधानपर्यंत पोहचविणार आहेत, असेही युवा नेते भारत चौधरी यांनी सभेत सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर सपाटे यांनी केले तर आभार शैलेश गजभिये यांनी मानले. याप्रसंगी पत्रकार अशोक गुप्ता, जी.जी. रंगारी, सुनिल जगिया व इतर विदर्भ आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)