लाखनी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:32 AM2021-01-22T04:32:22+5:302021-01-22T04:32:22+5:30

लाखनी : शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळावा पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत स्वप्नदीप मंगल कार्यालय, लाखनी येथे घेण्यात आला. यावेळी ...

Meeting of NCP workers at Lakhni | लाखनी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा

लाखनी येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यकर्ता मेळावा

Next

लाखनी : शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मेळावा पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत स्वप्नदीप मंगल कार्यालय, लाखनी येथे घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, दामाजी खंडाईत, तालुकाध्यक्ष डाॅ. विकास गभणे, शहराध्यक्ष धनू व्यास, अशोक चोले, नागेश वाघाये, जितेंद्र बोन्द्रे, अर्चना ढेंगे, नरेश इलमकर, नूतन मेंढे, संगीता उईके, आसिफ खान, लतीफ शेख, अरमान धरमसारे, प्रवीण बोरकर व अन्य मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नामुळे जिल्हयात सिंचन, आरोग्य, शिक्षा व अन्य क्षेत्रात अनेक विकासाची कामे झालेली आहेत. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतीच्या निवडणुकीत प्रामुख्याने लाखनी शहरातील अधिकाधिक उमेदवार व प्रतिनिधी निवडले पाहिजेत. तालुक्यात व शहरात पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्याने लक्ष देऊन एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहन केले. यावेळी मोरेश्वर दोनोडे, मनोज पोहरकर, प्रवीण बोरकर, रोहित साखरे, मोहित शेलके, शुभम रहांगडाले, कैलाश येरकडे, सचिन भैसारे, दत्तू हटनागर, राजू वालोदे, कार्तिक पुराम, आशिष सदनवार, अरमान घरमसारे, नितीन निर्वाण, दिनेश निर्वाण, रामू गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात काँग्रेसचे नगरसेवक, पूज्य सिंधी समाजाचे माजी अध्यक्ष, लाखनीचे प्रतिष्ठित व्यापारी मनोज टहिल्यानी यांनी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. या मेळाव्याचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष धनू व्यास यांनी केले तर प्रवीण बोरकर यांनी आभार मानले.

Web Title: Meeting of NCP workers at Lakhni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.