साकोली येथे समता सैनिक दलाची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:39 AM2021-09-06T04:39:07+5:302021-09-06T04:39:07+5:30
अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय स्टॉप ऑफिसर गजेंद्र गजभिये, जिल्हा समता ...
अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब कोचे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय स्टॉप ऑफिसर गजेंद्र गजभिये, जिल्हा समता सैनिक दलाचे पदाधिकारी कैलास गेडाम, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त व पत्रकार डी. जी. रंगारी, जिल्हा समता सैनिक दलाचे माया मेश्राम, तालुका समता सैनिक दलाचे चिरंजीव बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दादासाहेब कोचे म्हणाले, समता सैनिक दल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा दल असून खेड्यापाड्यांत, शहरामध्ये समता सैनिक दलाच्या शाखा वाढवणे आवश्यक आहे. घर तिथे समता सैनिक दल अशा पद्धतीची व्याख्या त्यांनी केली. घराघरामध्ये समता सैनिक दल पोहोचला पाहिजे. त्याचप्रमाणे घराघरामध्ये बाबासाहेबांचा विचार पोहोचला पाहिजे. त्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार पोहचविणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच दादासाहेब कोचे यांनी समता सैनिक दलाला एक एकर जमीन कार्यालयासाठी भंडारा येथे दान दिली.
संचालन व आभार तालुकाध्यक्ष चिरंजीव बारसागडे यांनी केले. या कार्यक्रमात बादशहा मेश्राम, ज्योती शहारे, प्रतिमा राऊत, गुलाब नदेश्वर, रेखा रामटेके, निशा राऊत, आशा लाडे, गायत्री टेंभुर्णे, बबिता जनबंधू, अनिकेत जनबंधू व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.