तुमसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:20 PM2018-02-09T22:20:24+5:302018-02-09T22:20:52+5:30

तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा येथील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

Meetings of all Congress workers | तुमसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

तुमसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश : नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
तुमसर : तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व सत्कार सोहळा येथील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार केशवराव पारधी हे होते. प्रमुख अतिथि म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार आनंदराव वंजारी, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रभारी तुमसर - मोहाडी विधानसभा प्रभारी आशावरी देवतळे, माजी अध्यक्ष मधुकर लिचड़े, माजी न. प. अध्यक्ष बशीर पटेल, सेवादल जिल्हा अध्यक्ष अरविंद कारेमोरे, तालुका तुमसर अध्यक्ष शंकर राऊत, जिल्हा महिला अध्यक्ष सिमा भूरे, आवेश पटेल, जि. प. सदस्य के. के. पंचबुद्धे, के. बी. चौरागड़े, भूषण टेंभुर्णे, विनोद भोयर, आशीष पात्रे, अध्यक्ष नगरपंचायत स्वाती निमजे, सुनील गिरिपुंजे, अशोक बंसोड़, राजेश ठाकुर, स्मिता बोरकर, कुसुम कांबळे, राजेश हटवार, नीरज गौर, शुभान गभणे, कमलाकर निखाड़े, अजय गोव्हरे,नईम शेख, समीर शेख,इत्यादि तुमसर मोहाड़ी तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे कार्यकर्त्ता व पदाधिकारी गण उपस्थिति दर्शवली.
मंचावर सत्कारमूर्ती म्हणून माजी खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, सभापती प्रेम वनवे, रेखाताई वासनिक, नवनिवार्चित सरपंच रामप्रसाद कहालकर, विनोद मते व उर्मिला कानपटे, ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थी प्रतनिधींचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र काँग्रेस कमीटीचे सचिव प्रमोद तितिरमारे यांच्या सहकायार्ने केले होते. नानापटोले यांनीकॉंग्रेस कार्यकर्ता व पदाधिकारी तसेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाºयांना संबोधित केले.
प्रमोद तितिरमारे म्हणाले की, केंद्र शासनाने दरवर्षी एक कोटी लोकांना रोजगार देण्याचे म्हले होते. अजूनही रोजगाराची संधी उपलब्ध झालेली नाही. शेतकऱ्यांच्या दीड पट हमी भाव देणार परतुं त्यांचा नियोजन कश्या प्रकारे देणार हे सांगितलेले नाही. कार्यकर्त्यांनी या सरकारच्या विरोधात पेटून उठले पाहिजेत, असेही तितिरमारे म्हणाले.
आशावरी देवतळे यांनी कांग्रेस प्रवेशाकरिता सगंठन मजबूत करण्याकरीता एकत्र खंबीरपणे उभे राहुन पक्ष मजबूत करण्याची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी कॉंग्रेस प्रबळ बनवण्या करीता व काय करावे व बूथ कमेटी याची माहिती दिली.आणि कोंग्रेस हा सामाजिक जमीनी स्थळावरुण कार्य करणारा संघटना आहे. लोकांचा हिता साठी कार्य करणारा व्यक्ति मत देणारा पक्ष आहे. अमर रगड़े यांनी कांग्रेस पक्षाचा विरतेचा इतिहास सांगुन समाजात खोटे बोलूं भाजपा सरकारला सत्ते मधे आली. माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी भाजपा सरकारवर चौफेरी हल्ला केला.
माजी आमदार सुभाष कारेमोरे, डॉ. पंकज कारेमोरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नागरिक व युवक व महिलांनी सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राजीव गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पंचायत समिती सदस्या उर्मिला कानपटे ,विनोद माने, उर्मिला शिवा नागपुरे तसेच जवळपास १० सरपंच यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी अन्य पक्षातील जवळपास १७२ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक मोहाडी तालुका अध्यक्ष प्रभू मोहतुरे यांनी तर आभार शैलेश पडोळे यांनी मानले.

Web Title: Meetings of all Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.