मेजर प्रफुल्ल यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:12 PM2017-12-26T22:12:45+5:302017-12-26T22:13:30+5:30

काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीरमरण आले.

Memorial to be commemorated by Major Praful | मेजर प्रफुल्ल यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार

मेजर प्रफुल्ल यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार

googlenewsNext
ठळक मुद्देपवनीत श्रद्धांजली सभेत संकल्प : स्मारकासाठी अवसरेंची २१ लाख रूपयांची घोषणा

आॅनलाईन लोकमत
पवनी : काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल्ल अंबादास मोहरकर यांना वीरमरण आले. शहीद वीरपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी पवनी नगरपालिका व नगर विकास आघाडीने सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन केले. पवनी तालुक्यातील युवकांचे श्रद्धास्थान व्हावे असे प्रेरणादायी स्मारक नगरात उभारण्यात यावे, असा संकल्प आयोजित श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त करताना केला.
महात्मा गांधी चौकात आयोजित श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये होते. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, आमदार रामचंद्र अवसरे, नगराध्यक्षा पुनम काटेखाये, उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर, मुख्याधिकारी माधुरी मडावी, बसपाचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश नंदूरकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.महेंद्र गोस्वामी, भाजपाचे शहर अध्यक्ष हरिश तलमले, जि.प.चे माजी सभापती विकास राऊत, माजी नगराध्यक्षा रजनी मोटघरे, जि.प.च्या माजी सभापती हंसा खोब्रागडे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अनिल धकाते, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, व्यापारी संघाचे प्रकाश नखाते, औषधी विक्रेता संघाचे सतीश लेपसे, रिपब्लिकन पक्षाचे हंसराज रामटेके, पत्रकार धनंजय जटाल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी माजी न.प. उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, माजी पं.स. सदस्य शैलेश मयूर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोहर उरकुडकर, पं.स. सदस्य मनोहर आकरे, युवाशक्ती संघनेचे देवराज बावनकर, नगर परिषदेचे सभापती व सर्व नगरसेवक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवनी नगर पालिकेने मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प केल्यामुळे मोहरकर कुटुंबियांनी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे अस्थिकलश सुपूर्द केला. अस्थिकलश दर्शनासाठी सभास्थळी ठेवण्यात आला होता. अस्थिकलशाचे पावित्र्य जोपासले गेले पाहिजे व स्मारक उभारण्यावरून राजकारण करण्यात येऊ नये असे हमीपत्र पालिकेकडून लेखी स्वरूपात घेऊन मोहरकर कुटुंबियांनी अस्थिकलश पालिकेच्या सुपूर्द केला. स्मारकाच्या उभारणीसाठी स्थानिक विकास निधीमधून २१ लाख रूपयांचा निधी देण्याचे आणि पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्यामार्फत अधिकच्या निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना घोषित केले.
शहीद मेजर प्रफुल्ल यांच्या देशसेवेपासून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे मनोगत माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात नगरविकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये यांनी शहीद मेजर प्रफुल्लच्या स्मारणात उभारण्यात येणारे स्मारक युवकांसाठी प्रेरणादायी ठरावे अशा स्वरूपाचे असेल असे सांगून स्मारक उभारणीसाठी नागरिकांनी सहकार्याची भावना ठेवावी असे मनोगत व्यक्त केले. सभेचे संचालन अ‍ॅड.व्ही.सी. खोब्रागडे यांनी केले. सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Memorial to be commemorated by Major Praful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.